फेडरल बँकेतर्फे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती योजनेची घोषणा
महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी फेडरल बँकेने सुरु केलेल्या हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. बँकेचे संस्थापक स्वर्गीय श्री. के. पी. हॉर्मिस यांच्या स्मरणार्थ ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेली आहे. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रति वर्ष एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.
महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये एमबीबीएस, बीई/बीटेक, बीएसस्सी नर्सिंग, एमबीए (पूर्णवेळ) आणि बीएसस्सी ॲग्रीकल्चर/बीएसस्सी (ऑनर्स) को-ऑपरेशन आणि बँकिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना मदत करते. गेल्या वर्षी दाखल झालेल्या एकूण 4,060 अर्जदार विद्यार्थ्यांपैकी 450 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या योजनेने महाराष्ट्राच्या शैक्षणिक परिदृश्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकलेला आहे.
हे देखील वाचा – रिअल इस्टेट, ऑफशोअर बेटिंगवरील जाहिरातींचे आधिक्य; एएससीआयचा सहामाही अहवाल जाहीर!
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष
• महाराष्ट्रातील सरकारी/अनुदानित/शासकीय मान्यताप्राप्त स्व-वित्तपुरवठा/स्वायत्त महाविद्यालयांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
• गुणवत्ता कोट्यानुसार प्रवेश मिळावा
• यासाठी विशेष विचार:
• शहीद सशस्त्र दलाच्या जवानांचे आश्रित पाल्य
• भाषण, दृष्टी किंवा श्रवणदोष असलेले विद्यार्थी
हे देखील वाचा – एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन; उद्योग जगतावर शोककळा!
शिष्यवृत्तीचे फायदे
• शैक्षणिक शुल्क आणि शैक्षणिक खर्चासाठी प्रति वर्ष 1 लाख रुपयांपर्यंत मदत
• अभ्यासक्रमादरम्यान पीसी/लॅपटॉप/टॅब्लेटसाठी एक वेळची परतफेड योजना
अर्ज प्रक्रिया
• याद्वारे अर्ज करा: फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती पोर्टल
• अंतिम मुदत: बुधवार, 18 डिसेंबर 2024
• आवश्यक कागदपत्रे:
• प्रवेश पत्र
• कोर्सच्या शुल्काची रचना
• गुणपत्रिका
• कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र
• महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
हे देखील वाचा – भारतात बी२बी प्रभावासाठी व्हिडिओ सर्वात लक्षवेधक, विश्वसनीय फॉर्मेट – लिंक्डइन
निवड प्रक्रिया उमेदवारांना यावर आधारित शॉर्टलिस्ट केले जाईल:
• पात्रता परीक्षेतील शैक्षणिक कामगिरी
• कौटुंबिक उत्पन्नाचे निकष
• कागदपत्र पडताळणीसाठी वैयक्तिक मुलाखत
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया फेडरल बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या ऑनलाईन पृष्ठाला भेट द्या. https://www.federalbank.co.in/corporate-social-responsibility