IndiGo Flights: इंडिगोची पुन्हा भरारी! २,५००हून अधिक उड्डाणांसह सेवा पूर्वपदावर; प्रवाशांना दिलासा (फोटो-सोशल मीडिया)
१ नोव्हेंबरपासून फ्लाइट ड्युटी टाइम लि. (एफडीटीएल) चा दुसरा टप्पा म्हणजेच, विश्रांतीचे तास वाढवणे आणि रात्रीच्या लँडिंगवर मर्यादा घालणे, यांसारखे नियम लागू झाल्यानंतर एअरलाइनने वैमानिकांच्या अकार्यक्षमतेमुळे देशभरातील इंडिगोची विमान वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून देशातील इंडिगोची सेवा पुर्वपदावर येऊ लागली आहे. आतापर्यंत १३८ कार्यरत ठिकाणांवरील विमान वाहतूक सुरळित सुरु झाल्याचा दावा इंडिगोने केला आहे. इंडिगोची विमान सेवा सुरळीत झाली आहे. या वैमानिक संकटानंतर इंडिगोची ऑपरेशनल रिकव्हरीमुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता इंडिगोची सेवा सावरली आहे.
विमान वाहतूक हळूहळू सुधारणा
इंडिगोची ऑपरेशनल रिकव्हरी हळूहळू सुरू झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या रद्दीकरणांपासून ते कमीत कमी व्यत्ययांपर्यंत आत्ता स्थिती आहे. ५ डिसेबर रोजी १ हजारापेक्षा कमी उखाणे असलेल्या इंडिगोच्या ऑपरेशन्समध्ये हळूहळू बाढ झाली आहे. रविवारी ही संख्या २,५०० हुन अधिक होती. यामुळे सुमारे साडे तीन लाख प्रवाशांना दिलासा मिळाला, उल्लेखनीय म्हणजे, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालक या संकटाची चौकशी करत असल्याने एअरलाइन नियामक तपासणीला सामोरे जात आहे. ज्यामुळे इंडिगोचे हिवाळी वेळापत्रक १०% ने कमी झाले. दरम्यान, ३ ते ५ डिसेंबर दरम्यान विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसानभरपाई दिल्याचा अंदाज एअरलाइनने व्यक्त केला आहे.






