Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US Ceasefire : युद्धविराम! आता तेल, गॅस, अन्नधान्यापासून ते विमान तिकिटांपर्यंत, जाणून घ्या काय होणार स्वस्त

शस्त्रसंधीमुळे थेट परिणाम भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांवर होताना दिसत आहे.. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, दैनंदिन वस्तू आता खरोखरच स्वस्त होतील का?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 08, 2026 | 08:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शस्त्रसंधीमुळे जागतिक राजकारणालाच दिलासा
  • दैनंदिन वस्तू आता खरोखरच स्वस्त होतील का?
  • तेव्हा पुरवठा धोक्यात आला आणि तेल अधिक महागलं
Iran US Ceasefire : इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीमुळे केवळ जागतिक राजकारणालाच दिलासा मिळाला नाही, तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होऊ लागला आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १३% ते १७% नी घसरल्या. याचा थेट परिणाम भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांवर होताना दिसत आहे.. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, दैनंदिन वस्तू आता खरोखरच स्वस्त होतील का? या शस्त्रसंधीच्या निर्णयामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस, खते, वाहतूक आणि हवाई प्रवास किती स्वस्त होतील, याबाबतची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात

तेव्हा पुरवठा धोक्यात आला आणि तेल अधिक महागलं

जेव्हा इराण-इस्रायल-अमेरिका संघर्ष सुरू झाला, तेव्हा पेट्रोल आणि डिझेल, गॅस, वाहतूक आणि हवाई प्रवास यांसारख्या काही दैनंदिन वस्तूंच्या किमती हळूहळू गगनाला भिडल्या. या तणावाचा सर्वात मोठा परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीवर झाला, जिथून जगातील सुमारे २५% तेलाची वाहतूक होते. जेव्हा येथे तणाव वाढला, तेव्हा पुरवठा धोक्यात आला आणि तेल अधिक महाग झाले. आता, युद्धविरामानंतर, पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे किमतींमध्ये घट होणार आहे असं मानलं जात आहे.

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, आता ‘आयुष्मान कार्ड’ साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, ‘असं’ झटपट मोबाईलवरच होईल काम

होर्मेझची सामुद्रधुनी काय आहे?

होर्मुझची सामुद्रधुनी हा पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताच्या दरम्यान असलेला जगातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात अरुंद सागरी मार्ग आहे. तो इराण आणि ओमान/संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) मध्ये स्थित आहे. सुमारे ३३ किलोमीटर रुंद असलेल्या या सामुद्रधुनीतून जागतिक तेलाच्या सुमारे २०-२५% तेलाची वाहतूक होते, ज्यामुळे ती जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

पेट्रोल आणि डिझेलसह कोणत्या गोष्टींवर परिणाम होईल?

आता, भारतातील शस्त्रसंधीचा पहिला परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर दिसू शकतो. किमती लगेच कमी होणार नसल्या तरी, आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण सुरू राहिल्यास, तेल कंपन्या येत्या काही दिवसांत दिलासा भेटू शकतो. याचा फायदा केवळ वाहनचालकांनाच नाही, तर संपूर्ण वाहतूक व्यवस्थेला होणार आहे. डिझेल स्वस्त झाल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो, ज्यामुळे भाजीपाला, दूध, शिधावाटप, खते, प्लास्टिक वस्तू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती हळूहळू कमी होऊ शकतात. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला लागलेल्या कात्रीला थोडासा दिलासा मिळू शकतो.

एलपीजीवरही त्याचा परिणाम

याचा परिणाम स्वयंपाकाच्या गॅसवर (एलपीजी) होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या कमी किमतींमुळे सिलेंडरचा खर्च कमी होऊन घरगुती खर्चावरील ताण कमी होऊ शकतो. शिवाय, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरच्या कमी किमतींमुळे बाहेर जेवण करणेही अधिक परवडणारे होऊ शकते. रस्त्यावरील विक्रेत्याकडे किंवा दुकानात जो समोसा २० रुपयांना मिळायचा, तो पुन्हा १० रुपयांना मिळू शकेल.

विमान प्रवास स्वस्त होईल

ही हवाई प्रवाशांसाठीही एक चांगली आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. विमान कंपन्यांसाठी इंधन हा एक मोठा खर्च असतो. सध्याची परिस्थिती पाहता विमानाचे दर चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे तेलाच्या कमी किमतींमुळे विमान भाडे कमी होऊ शकते. याशिवाय, प्लॅस्टिक, पॅकेजिंग, कापड आणि इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या किमतीही कमी होऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या दरांना दिलासा मिळणार आहे.

टायर, रंग आणि कपड्यांचा खर्च कमी

शस्त्रसंधीमुळे एफएमसीजी वस्तू आणि ई-कॉमर्स कंपन्यांची डिलिव्हरी स्वस्त होईल. बाईक आणि कारसह सर्व वाहनांसाठी लागणारे टायर, पेंट, बाह्य आवरण आणि पॅकेजिंग साहित्याच्या किमतीही कमी होतील.

शेतकऱ्यांना काय होणार फायदा?

कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे जवळपास सर्वच उद्योगांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि त्याचा फायदा हळूहळू ग्राहकांपर्यंत पोहोचेल. एलएनजीचा वाढलेला पुरवठा वायूवर आधारित वीज निर्मिती कंपन्यांनाही दिलासा देईल, ज्यामुळे शेतकऱ्यांची महागड्या सिंचनाच्या खर्चापासून सुटका होईल. याचा फायदा खत कंपन्या आणि शेतकरी या दोघांनाही होणार आहे.

शस्त्रसंधी कायम राहिल्यासच किमती कमी होतील का?

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की याचा परिणाम लगेच दिसून येणार नाही. बाजारात नवीन किमती प्रभावी होण्यासाठी १-३ आठवडे लागू शकतात. शिवाय, जर ही तात्पुरती स्थगिती कायमस्वरूपी नसेल, तर किमती पुन्हा वाढू शकतात. ही घडामोड जनतेसाठी दिलासादायक आहे, परंतु जर ही शांतता पुरेशी टिकली आणि सरकारने योग्य ती कारवाई केली, तरच याचे खरे फायदे मिळतील.

Gold Silver Price Hike : चांदी 13000 रुपयांनी महागली, तर सोन्याने ओलांडला नवा टप्पा, का वाढले एकाएकी दर?

Web Title: Iran us ceasefire impact oil gas food prices to fall soon check out what will be cheaper in india marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Indian Oil
  • Iran Israel Conflict
  • Marathi News
  • oil
  • Oil Crisis
  • UAE

संबंधित बातम्या

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग
1

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग

Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2

Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
3

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह
4

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.