
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रस्ते सुरक्षिततेबाबत संशोधनाचं म्हणणं काय? 10 पैकी 9 जण सुरक्षित? पण कमी वाहतूक तज्ज्ञ याच्याशी सहमत
संयुक्त निवेदनानुसार, जागतिक सौंदर्य ब्रँड्सच्या उत्पादनांची श्रेणी विस्तारण्याच्या ‘तिरा’च्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. निवेदनानुसार, डॉ. मेलॅक्सिन हे त्यांच्या विज्ञान-आधारित स्किनकेअर तंत्रज्ञान आणि ‘स्लो एजिंग’ या संकल्पनेसाठी ओळखले जाते.
डॉ. मेलाक्सिनची उत्पादने पिगमेंटेशन, डोळ्यांखालील वृद्धत्वाची चिन्हे आणि त्वचेचा सैलपणा यांसारख्या समस्यांवर उपाय करण्यासाठी तयार केली आहेत. हा ब्रँड अमेरिका, जपान आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. अमेरिका आणि यूके या दोन्ही देशांतील टिकटॉक शॉपवर हा एक लोकप्रिय के-ब्रँड म्हणून ओळखला जातो.
डॉ. मेलॅक्सिनच्या सीईओ यू क्युंग ह्वा यांनी पुढे स्पष्ट केलं की, “भारतीय ग्राहक प्रभावी आणि सायंस-बेस स्कीन केअरच्या उत्पादनांना अधिकाधिक प्राधान्य देत आहेत. पिगमेंटेशन, त्वचेचा पोत आणि सैल झालेली त्वचा यांसारख्या समस्या लक्षात घेऊन विकसित केलेली कंपनीची उत्पादने भारतीय ग्राहकांच्या गरजांनुसार तयार केली आहेत आणि ‘तिरा’ सोबतच्या आमच्या भागीदारीतून भारतात सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.”
तिराने म्हटले आहे की, या भागीदारीमुळे जगातील विश्वसनीय आणि प्रीमियम सौंदर्य ब्रँड्स भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची आपली रणनीती अधिक मजबूत होत आहे. तिरा हे रिलायन्स रिटेलने सुरू केलेले एक ओम्निचॅनल सौंदर्य आणि वैयक्तिक निगा रिटेल प्लॅटफॉर्म आहे. ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मवर मेकअप, स्किनकेअर आणि सुगंध या क्षेत्रांतील जागतिक आणि देशांतर्गत ब्रँड्सचा निवडक संग्रह उपलब्ध आहे. या ब्रँडची प्रत्यक्ष दुकाने आणि डिजिटल प्लॅटफॉर्म दोन्ही आहेत.
Toll : टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! आता मोबाईलवर काही मिनिटांत मिळणार Digital पास