आयटीआर, क्रेडिट कार्डचे नियम! वाचा... जुलै महिन्यात कोणकोणते नियम बदलणार!
जून महिना संपत आला आहे. लवकरच जुलै महिना चालू होईल. आगामी जुलै महिन्यात अनेक आर्थिक कामांची डेडलाईन संपणार आहे. यामध्ये पेटीएम वॉलेटपासून ते क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. याशिवाय 1 जुलैपासून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचे नियम देखील बदलणार आहेत. सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास, लॉकिंग कालावधी 7 दिवसांचा असेल. म्हणजे 7 दिवसांनी तुम्हाला नवीन सिम मिळणार आहे.
इनअॅक्टिव्ह वॉलेट्स बंद होणार
पेटीएमची पॅरेन्ट कंपनी वन97 कम्यूनिकेशन्सने सांगितल्यानुसार पेटिएम पेमेंट्स बँकेचे इनअॅक्टिव्ह वॉलेट 20 जुलै 2024 पासून बंद करण्यात येणार आहेत. या निर्णयाअंतर्गत एका वर्षांपासून अधिक काळासाठी कोणतेही व्यवहार नसलेले इनअॅक्टिव्ह वॉलेट्स बंद करण्यात येतील. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांतही बदल करण्यात येत आहे. हे नवे नियम 1 जुलै 2024 पासून हे नवे नियम लागू होतील. नव्या नियमानुसार कार्ड रिप्लेसमेंटसाठी ग्राहकांना 100 ऐवजी 200 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
पीएनबी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डच्या लाउंज अॅक्सेसच्या नियमांतही बदल करण्यात येणार आहेत. आता ग्राहकांना एका तिमाहीत 1 देशांतर्गत एयरपोर्ट लाउंज अॅक्सेस मिळणार आहे. अॅक्सिस बँकने सर्व सिटी बँक क्रेडिट कार्ड होल्डर्सना त्यांचे क्रेडिट कार्ड अकाऊंट 15 जुलैपर्यंत ट्रान्सफर करण्याचे सांगितले आहे.
आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत
आर्थिक वर्ष 2023-24 आणि असेसमेंट वर्ष 2024-25 साठी आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. या तारखेनंतर तुम्हाला दंड भरून आयटीआर भरावा लागेल. एसबीआयने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सरकारी ट्रान्झेक्शनवर रिवॉर्ड पॉइंट्स देण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा निर्णय 1 जुलै 2024 पासून लागू होईल.
क्रेडिट कार्ड बिल भरण्याचे नियम
क्रेडिट कार्ड बिल भरण्याचे नवीन नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. नवीन नियमांनुसार सर्व बँकांना भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल. SBI कार्डने एका निवेदनातून म्हटले की, 1 जुलै 2024 पासून काही क्रेडिट कार्डांसाठी सरकारी व्यवहारांवरील रिवॉर्ड पॉइंट्स थांबतील. असे म्हटले आहे.
तर ICICI बँकेने 1 जुलै 2024 पासून अनेक क्रेडिट कार्ड सेवांमध्ये सुधारणा जाहीर केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे सर्व कार्डांवर कार्ड बदलण्याचे शुल्क 100 रुपयांवर वरून 200 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याशिवाय Axis Bank ने Citibank क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड खात्यांसह सर्व नातेसंबंध स्थलांतरित करण्याबद्दल सूचित केले आहे. जे 15 जुलै 2024 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सिटी बँक क्रेडिट कार्ड आता ॲक्सिस क्रेडिट कार्ड बनतील.