Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता घर कसं चालणार? मध्यमवर्गीयांना चौफेर फटका… भाजीपाल्यापासून इंधनापर्यंत सगळंच महागलं

बजेट तयार करणे आता पूर्वीइतकं सोपे राहिलेले नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकघरातील खर्च असो, मुलांचे शिक्षण असो किंवा दररोजच्या प्रवासाचा खर्च जवळपास प्रत्येकच आघाडीवर आर्थिक बोजा वाढलेलाच पहायला मिळतो. त्याचबरोबर अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमतीत झालेली अलीकडील वाढ आणखी पेचात टाकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 13, 2026 | 04:40 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

बजेट तयार करणे आता पूर्वीइतकं सोपे राहिलेले नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकघरातील खर्च असो, मुलांचे शिक्षण असो किंवा दररोजच्या प्रवासाचा खर्च जवळपास प्रत्येकच आघाडीवर आर्थिक बोजा वाढलेलाच पहायला मिळतो. त्याचबरोबर अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमतीत झालेली अलीकडील वाढ सामान्य कुटुंबांच्या चिंतेत वाढ झाली आहे. किरकोळ महागाईचा दर वाढण्यामागे अन्नपदार्थ आणि इंधनाच्या वाढलेल्या किंमती हे महत्त्वाचं कारणं मानलं जात आहे.

याड लागलं… लंडनपासून सौदी अरेबियापर्यंत, भारताच्या आंब्यांचं जगाला वेड; तोतापुरी, लंगडा, दशहरी यांचा बोलबाला

स्वयंपाकघराच्या बजेटवर सर्वाधिक परिणाम

भाज्या, फळे आणि दैनंदिन आहारातील आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होत आहे. ज्या वस्तू पूर्वी ठराविक रकमेत खरेदी करता येत होत्या, त्यांच्यासाठी आता अधिक खर्च करावा लागत आहे. उन्हाळ्याचा तडाखा, पुरवठ्यातील व्यत्यय आणि वाढलेला वाहतूक खर्च यांसारख्या घटकांमुळे अन्नधान्य महागाई वाढली आहे. अनेक कुटुंबांनी असे नमूद केले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांचे किराणा मालाचे मासिक बजेट लक्षणीयरीत्या वाढले आहे, मात्र त्या प्रमाणात त्यांचे उत्पन्न वाढलेले नाही.

इंधन महागलं की सर्वच महागलं

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम केवळ वाहने चालवण्याच्या खर्चापुरता मर्यादित राहत नाही. वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, दूध, किराणा माल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढतात. परिणामी, इंधनाच्या किमतीतील प्रत्येक वाढीचा फटका सामान्य माणसाच्या खर्चावर विविध आघाड्यांवर बसतो. तज्ज्ञांच्या मते, जर ऊर्जा क्षेत्रातील किमतींवरील दबाव कायम राहिला, तर आगामी काळात महागाई आणखी वाढू शकते.

मुलांची शालेय फी आणि इतर खर्चही वाढणार

मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी शिक्षण ही नेहमीच प्राधान्याची बाब राहिली आहे, तरीही त्याशी संबंधित खर्च सातत्याने वाढत आहेत. शालेय फी, पुस्तके, गणवेश, शिकवणी आणि वाहतूक यांसारख्या गोष्टींवर कुटुंबाच्या मासिक बजेटचा मोठा हिस्सा खर्च होत आहे. ज्या कुटुंबांवर आधीच गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर EMIs चं ओझे आहे, त्यांच्यासाठी यामुळे आर्थिक ताण अधिकच वाढतो.

बचतीवर होणारा परिणाम

वाढत्या खर्चाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे लोकांच्या बचतीला लागणारी कात्री. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक कुटुंबांना गुंतवणूक किंवा बचत योजनांमधील आपली गुंतवणूक कमी करण्यास भाग पाडले जात आहे. अशा परिस्थितीत, कुटुंबांनी आपल्या खर्चाला प्राधान्य द्यावे आणि अनावश्यक खर्च टाळावा, असा सल्ला आर्थिक नियोजक देतात.

पुढे काय दिलासा मिळू शकेल?

अर्थतज्ज्ञांच्या मते, आगामी काळात महागाईची दिशा ही प्रामुख्याने अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमतींवर अवलंबून असेल. जर कच्च्या तेलाचे भाव चढेच राहिले आणि अन्नधान्य पुरवठ्यावरचा ताण कायम राहिला, तर घरगुती बजेटवरील भार आणखी वाढू शकतो. सध्या मध्यमवर्गीयांसमोरील मुख्य आव्हान म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे. स्वयंपाकघरातील खर्चापासून ते शाळेची फी आणि वाहतुकीपर्यंत सर्वच गोष्टी महागल्या आहेत. अशा परिस्थितीत, वाढत्या महागाईच्या काळात दिलासा मिळवण्यासाठी सुज्ञ आर्थिक नियोजन आणि खर्चावर नियंत्रण हेच एकमेव मार्ग आहेत.

Petrol-Diesel New Rule : पेट्रोल पंपांवरील ‘त्या’ नियमामुळे खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण ?

Web Title: Middle class budget hit by inflation vegetable and fuel prices rise marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • emi
  • Indian Inflation
  • Inflation News
  • rising inflation

संबंधित बातम्या

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ
1

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

अरे, देवा! EMI महागणार… ऑक्टोबरमध्ये RBI वाढवणार Repo Rate; अहवालात नेमका काय दावा?
2

अरे, देवा! EMI महागणार… ऑक्टोबरमध्ये RBI वाढवणार Repo Rate; अहवालात नेमका काय दावा?

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित
3

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित

आता पेमेंट फेल नाही होणार…  NPCI ने लाँच केला eNACHLite; जाणून घ्या कसं काम करते?
4

आता पेमेंट फेल नाही होणार… NPCI ने लाँच केला eNACHLite; जाणून घ्या कसं काम करते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.