एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा
शेअर मार्केटमधील अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून देत आहे. त्यांच्यापैकी अनेक स्टॉक्सने तर गुंतवणूकदारांना अल्पावधीत गुंतवणूकदारांच्या पैशांचे रूपांतर कोट्यवधींमध्ये केले आहे. या शेअर्समध्ये सतत अपर सर्किट होत आहे. शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम त्यांच्यावर अजिबात दिसून येत नाहीये. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक सध्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देत आहे.
दोन महिन्यांपासून अप्पर सर्किटला
आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड असे या शेअर्सचे नाव आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच श्रीमंत केले आहे. अलीकडच्या काळात शेअर बाजारात घसरण झाली असली तरी सुमारे दोन महिन्यांपासून तो अप्पर सर्किटला व्यवहार करत आहे. शुक्रवारी (ता.२०) देखील तो दोन टक्क्यांच्या वरती सर्किटला व्यवहार करत होता. त्यानंतर जेव्हा बाजार घसरला. तेव्हा या शेअरची किंमत 616.85 रुपयांपर्यंत घसरली आहे.
दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट परतावा
आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड या शेअर्सने दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 29 ऑक्टोबर रोजी या शेअरची किंमत 312.25 रुपये होती. जी आता 616.85 रुपयांपर्यंत वधारली आहे. अशा परिस्थितीत, दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याचा परतावा 100 टक्क्यांहून अधिक राहिला आहे. म्हणजेच 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर 2 लाखांमध्ये झाले आहे.
6 महिन्यांत भरली गुंतवणूकदारांची झोळी
आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड या शेअरने ६ महिन्यांत गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. या शेअर्सने 6 महिन्यांत 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 112.75 रुपये होती. अशा परिस्थितीत कंपनीने आतापर्यंत सुमारे ४४७ टक्के परतावा दिला आहे. म्हणजे अवघ्या 6 महिन्यांत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर सुमारे 5.5 लाख रुपयांमध्ये झाले आहे.
एक वर्षाबद्दल बोलायचे झाले या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. एका वर्षात त्याचा परतावा 1010 टक्के आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज हे 1 लाख रुपये 11 लाखात रूपांतरित झाले असते. अशा परिस्थितीत तुम्हाला एका वर्षात 10 लाख रुपये नफा झाला असता. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झालेले पाहायला मिळत आहे.
आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. 5 वर्षात त्याचा परतावा 4875 टक्के इतका आहे. त्यामुळे 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर गुंतवणूकदारांना त्यापासून सुमारे 49.75 लाख रुपये म्हणजेच जवळपास 50 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 2 लाख रुपये गुंतवले असते. तर आज त्यापासून सुमारे 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळाला असता. म्हणजेच तुम्ही ५ वर्षात करोडपती झालेले असतात.
किती आहे कंपनीचे मार्केट कॅप?
बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या कंपनीचे मार्केट कॅप 802.66 कोटी रुपये इतके आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 26.58 कोटी रुपये होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हा महसूल ७.१६ कोटी रुपये होता. या काळात कंपनीच्या निव्वळ नफ्यातही वाढ झाली आहे.