बीएसईवर सूचीबद्ध कंपनी एल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअरने गुंतवणूकदारांना वेड लावायचेच बाकी ठेवले आहे. गेल्या एका महिन्यापासून या शेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांन 55,751 पट परतावा दिला आहे. या कंपनीचे सध्या 3,804 कोटी रुपये मार्केट कॅप आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीच्या अखेरीस केवळ 322 शेअरधारक होते.
सहा प्रमोटर्सला मिळून ही संख्या 328 च्या घरात होती. या शेअरधारकांकडे 50,000 शेअर आहेत. त्यांचा या कंपनीत 25 टक्के वाटा आहे. यामध्ये 284 किरकोळ गुंतवणूकदारांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 2 लाख रुपयांचे शेअर आहेत. त्यांच्याकडे कंपनीत 7.43 टक्के हिस्सेदारी आहे. या रचनेत फारसा बदल झालेला नाही.
अचानकच दिला छप्परफाड रिटर्न
हा अनेकांसाठी परिचित पण फायदा न होऊ शकलेला स्टॉक आहे. 2023 मध्ये या शेअरने केवळ दोन दिवस व्यापार केला. तर 2021 मध्ये केवळ 9 दिवस व्यापार केला. हा स्टॉक गेल्या काही वर्षांपासून केवळ 2 ते 3.50 रुपये प्रति शेअरवर व्यापार करत होता. सेबीने ही बाब हेरली आणि नोटीस दिली. त्यानंतर एल्सिड इन्वेस्टमेंट्सने 29 ऑक्टोबर रोजी जवळपास 67 हजार टक्क्यांची अचानक उसळी घेतली.
शेअर बाजारात घसरणीची मालिका सुरुच; वाचा… कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले
कंपनीचा शेअर 29 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात 3.53 रुपयांहून वधारून 2,36,250 रुपयांवर पोहचला. या नवीन अपडेटमुळे एल्सिड इन्वहेस्टमेंटचा शेअर भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक ठरला आहे. बीएसई आणि एनएसईवर आयोजित एका स्पेशल कॉल ऑक्शनमुळे ही तेजी आल्याचे दिसून आले. हा स्टॉक 8 नोव्हेंबर रोजी 3,32,399.95 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहचला. या शेअरने 10 हजार रुपयांची गुंतवणूक 94 कोटी रुपयांवर पोहचली. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात या शेअरमध्ये विक्री सत्र दिसले.
काय काम करते कंपनी?
एल्सिड इन्व्हेस्टमेंट, आरबीआय अंतर्गत गुंतवणूक श्रेणीतील एक नोंदणीकृत गैर बॅकिंग वित्तपुरवठा कंपनी आहे. कंपनीच्या कमाईतील मुख्य स्त्रोत हा त्यांच्या होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंटने एशियन पेंट्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीकडे पेंट कंपनीत 8500 कोटी म्हणजे 2.95 टक्के वाटा आहे. कंपनीकडे 200,000 शेअर आहेत. त्यातील 150,000 शेअर प्रमोटरोकडे आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)