शेअर बाजारात घसरणीची मालिका सुरुच; वाचा... कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले
मंगळवारी (ता.24) भारतीय शेअर बाजारात काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 67 अंकांनी घसरला आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवल काढणे सुरूच राहिल्याने ठोस निर्देशकांच्या अभावी गुंतवणूकदार बाजारापासून दूर राहिले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 67.30 अंकांनी किंवा 0.09 टक्क्यांनी घसरून, 78,472.87 अंकांवर बंद झाला आहे.
कशी राहिली आज निफ्टीची वाटचाल
आज शेअर बाजारात व्यवहारादरम्यान, एका पातळीदरम्यान सेन्सेक्स 142.38 अंकांपर्यंत घसरला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 25.80 अंकांच्या किंवा 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह 23,727.65 अंकांवर बंद झाला. बीएसईचा सेन्सेक्स सोमवारी 498.58 अंकांच्या वाढीसह 78,540.17 अंकांवर बंद झाला होता. तर एनएसईचा निफ्टी 165.95 अंकांनी वधारला होता.
‘या’ आयपीओद्वारे गुंतवणूकदार मालामाल, झालीये जोरदार लिस्टींग; वाचा… कितीये शेअरची किंमत?
कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील ३० समभागांमध्ये पॉवर ग्रिड, स्टेट बँक ऑफ इंडिया, टायटन, टाटा स्टील, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स आणि इन्फोसिस या समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे, लाभ धारक शेअर्समध्ये टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एनटीपीसी आणि झोमॅटो यांचा समावेश आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 168.71 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.
मागील आठवडा ठरला निराशेचा
दरम्यान, गेल्या आठवड्यातील पाचही दिवस देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. त्यानंतर सोमवारी शेअर बाजार काहीसा वधारला. मात्र, आशियातील इतर बाजारांमध्ये प्रामुख्याने चीनचा शांघाय कंपोझिट नफ्यात तर दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई तोट्यात होता. दुपारच्या व्यवहारात युरोपातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फायदेशीर कल होता. तर सोमवारी अमेरिकन बाजार तेजीत होते. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.62 टक्क्यांनी वाढून 73.08 प्रति डॉलर बॅरलवर पोहोचले होते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)