मुंबईने पुन्हा घातली आकाशाला गवसणी; जगातील उंच इमारतींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर!
उंच उंच इमारती, गगनचुंबी टॉवर्स यांची सर्वांनाचा भुरळ पडते. अनेकांना गगनचुंबी इमारतींमध्ये राहण्याचे आकर्षण असते. मात्र, तुम्हांला माहीतीये का जगात सर्वाधिक उंच इमारती अर्थात 150 मीटर पेक्षा अधिक उंच इमारती कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे भारताला या देशांच्या यादीमध्ये स्थान नसले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबई सर्वाधिक उंच इमारती असलेल्या शहरांच्या यादीत १५ व्या क्रमांकावर आहे. मुंबई वगळता अन्य कोणत्याही शहराला पहिल्या १०० शंभर सर्वाधिक उंच इमारती असलेल्या शहरांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
150 मीटरपेक्षा अधिक उंच इमारती चीनमध्ये सर्वाधिक
अमेरिकेनंतर चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या तीन दशकांत या देशाने अनेक आघाड्यांवर मोठी कामगिरी केली आहे. यामध्ये रिअल इस्टेटचाही समावेश आहे. अनेक वर्षांपासून हे क्षेत्र चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दरम्यान, 150 मीटरपेक्षा अधिक उंच इमारती असलेल्या जगातील शहरांमध्ये चीनचे वर्चस्व आहे. अशा टॉप 10 शहरांमध्ये चीनमधील सहा शहरांचा समावेश आहे. तर भारतातील एकही शहराला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. असे असले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत 15 व्या क्रमांकावर आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
दुबईचा या यादीत चौथा क्रमांक
चीनमध्ये 300 मीटरपेक्षा उंच 57 इमारती आहेत. याउलट भारतात 300 मीटरपेक्षा उंच असलेली केवळ एकच इमारत आहे. हॉंगकॉंग या शहरात 558 इमारती आहेत. ज्यांची उंची 150 मीटरपेक्षा जास्त आहे. या यादीत चीनचे शेन्झेन हे शहर ४१४ इमारतींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत न्यूयॉर्क तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरात 318 उंच इमारती आहेत. चौथा क्रमांक दुबईचा आहे. दुबईमध्ये जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा देखील आहे. जिची उंची 828 मीटर इतकी आहे.
मुंबई या यादीत 15 व्या क्रमांकावर
भारताची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत 15 व्या क्रमांकावर आहे. मुंबई शहरातील 101 इमारतींची उंची 150 मीटरपेक्षा जास्त आहे. यापैकी 42 इमारतींची उंची 200 मीटरपेक्षा जास्त आहे, तर एका इमारतीची उंची 300 मीटरपेक्षा जास्त आहे. मुंबईशिवाय टॉप 100 उंच इमारतींच्या यादीमध्ये एकही भारतीय शहराला स्थान मिळवता आलेले नाही. या यादीत कोलकाता हे शहर 114 व्या क्रमांकावर आहे. कोलकातामध्ये 10 इमारती 150 मीटरपेक्षा जास्त उंच आहेत.