'या' आयपीओवर तुटून पडलेत गुंतवणूकदार; तब्ब्ल 103 वेळा झालाय सबस्क्राइब!
एनटीपीसी लिमिटेडची उपकंपनी असलेली कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ 18 ते २१ नोव्हेंबर दरम्यान उघडण्याची शक्यता आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 12 बिलियन डॉलरचे मूल्यांकन साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेऊन बाजारातून पैसे उभारू शकते. त्यामुळे आता एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ हा अक्षय ऊर्जा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो.
10000 कोटी रुपये उभारले जाणार
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आपल्या आयपीओची किंमत 100 प्रति शेअरच्या (1.18 डॉलर) वर ठेवण्यासाठी आयपीओ सल्लागारांशी चर्चा करत आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओद्वारे बाजारातून 10000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा आयपीओ 18 ते 21 नोव्हेंबरपर्यंत खुला राहण्याची शक्यता आहे. कंपनीने सध्या प्राइस बँड ठरवला नसून, त्यावर चर्चा सुरू आहे. 10 रुपये प्रति शेअर दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सची फ्लोअर प्राइस, कॅप किंमत आणि इश्यू किंमत बीआरएलएमशी सल्लामसलत केल्यानंतर ठरवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – शेअर बाजारात मोठी आपटी; एकच दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान!
पूर्णपणे नवीन शेअर जारी केले जाणार
ऑक्टोबर महिन्यात, शेअर बाजार नियामक सेबीने एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) ला मान्यता दिली होती. कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसीची उपकंपनी आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओमध्ये पूर्णपणे नवीन इश्यू असेल, म्हणजेच कंपनी नवीन शेअर जारी करणार आहे. तर प्रवर्तक कंपनी आयपीओमधील आपला हिस्सा विकणार नाही.
हे देखील वाचा – नववर्षात खुशखबर मिळणार… सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!
कंपनी निधीचा वापर कुठे करणार
एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओमध्ये उभारणाऱ्या 10,000 कोटींपैकी 7500 कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जाणार आहे. कंपनी उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देश आणि विस्तारासाठी खर्च करणार आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओमध्ये काही शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव असणार आहेत. कर्मचाऱ्यांना आयपीओच्या किमतीतही सूट दिली जाईल. एनटीपीसी भागधारकांसाठी देखील शेअर्स राखीव असणार आहेत. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर लिस्ट केले जातील.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)