श्रीराम फायनान्स (फोटो- सोशल मीडिया)
‘उन्नती’ मुदत ठेव योजनेला मिळाला सर्वोच्च पतमापन दर्जा
गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह
कर्ज योजना आणि बँक सुविधांनाही ‘केअर एएए; स्टेबल’ दर्जा
पुणे: श्रीराम फायनान्स लिमिटेड च्या ‘उन्नती’ मुदत ठेव योजनेला केअर रेटिंगने ‘केअर एएए; स्टेबल’ हा सर्वोच्च पतमापन दर्जा बहाल केला आहे. या दर्जातून कंपनीची कर्जउभारणी क्षमता, आर्थिक स्थैर्य आणि ठेवीदारांना वेळेवर निधी परत करण्याची उच्च क्षमता स्पष्ट झाली आहे. कंपनीची आर्थिक लवचिकता मजबूत असून गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे या पतमापनातून अधोरेखित झाले आहे .केअर रेटिंग्जने कंपनीच्या दीर्घकालीन कर्ज योजना आणि बँक सुविधांनाही ‘केअर एएए; स्टेबल’ दर्जा दिला आहे.
तसेच, अल्पकालीन व्यावसायिक कर्जपत्रांसह (कमर्शिअल पेपर) कर्ज उभारणी पर्यायांना ‘केअर ए१+’ दर्जा पुन्हा बहाल करण्यात आला आहे, ज्यामुळे कंपनीच्या मजबूत आर्थिक व्यवस्थापनाची पुष्टी झाली आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर म्हणाले, “आम्हाला मिळालेला पतमापन दर्जा आमच्या आर्थिक ताकदीचे आणि ठेवीदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ठेवीदारांना स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करताना सातत्यपूर्ण आणि संतुलित वाढ साध्य करणे हे आमचे प्राधान्य आहे.” क्रिसिल रेटिंग्जने कंपनीचा अल्पकालीन दर्जा ‘क्रिसिल ए१+’ वर कायम ठेवला असून बँक सुविधा आणि डिबेंचर्ससह अनेक दीर्घकालीन पर्यायांना सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे. यामुळे कंपनीच्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे भविष्यात आर्थिक स्थिती आणखी सुधारण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे.
Anil Ambani News: अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली
आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे
देशात पायाभूत सुविधांची वेगाने होत असलेली उभारणी, मालवाहतूकीत जोरदार उसळी आणि ग्रामीण भागात रोखतेच्या प्रवाहात सुधारणा आदी कारणांमुळे भारतात व्यावसायिक वाहन (सीव्ही) खरेदीसाठीच्या वित्तपुरवठा बाजारपेठेने आपली ताकद कायम राखली आहे. हलकी व्यावसायिक वाहने (एलसीव्ही) आणि जड व्यावसायिक वाहने (एचसीव्ही) देशाच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक आणि शहरांतर्गत वाहतुकीत वृध्दी घडवून आणत आहेत. पायाभूत सुविधांची उभारणी, मालवाहतूक क्षेत्राचा विस्तार आणि वाहनांचा ताफा बदलण्याच्या प्रक्रियेतून वाहन खरेदीच्या मागणीला प्रोत्साहन देत श्रीराम फायनान्स वित्तपुरवठा क्षेत्रातील आपले नेतृत्वस्थान आणखी बळकट करण्यासाठी जोरदार मेहनत घेत आहे.
एकट्या महाराष्ट्रासाठी श्रीराम फायनान्सचा सीव्हीसाठीचा वित्तपुरवठा पोर्टफोलिओ सप्टेंबर २०२५ अखेरीस तब्बल ११ हजार २०५ कोटी रुपयांवर पोहचला आहे. बाजारपेठेत वित्तपुरवठ्याच्या मागणीत सातत्य असल्याची ठळक बाब या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे. सीव्ही वाहनांसाठी कंपनीचा भारतभरातील एकूण वित्तपुरवठा अर्थात एयूएम याच कालावधीसाठी तब्बल एक लाख २८ हजार १४० कोटी रुपयांवर झेपावला आहे. व्यावसायिक वाहन खरेदीसाठीच्या कर्जपुरवठ्यात कंपनी अग्रभागी असल्याचे या आकडेवारीतून प्रतिबिंबित झाले आहे.






