नुवामा वेल्थ कडून महिला दिवस साजरा करण्यासाठी महिला उद्योजक वी (WE) बाजारचे आयोजन (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या दिवसभराच्या उपक्रमात महिला उद्योजकांना एक अद्वितीय अनुभव, मार्गदर्शन आणि व्यावसायिक पाठबळ मिळाले. तसेच आपले कार्य, उद्योजकता, कलात्मकता आणि नावीन्यपूर्ण गोष्टी १०,००० पेक्षा अधिक समभागधारकांसमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. वी (WE) बाजारच्या पहिल्या आवृत्तीत ११ अद्वितीय महिला उद्योजक सहभागी झाल्या. त्यांची निवड त्यांच्या प्रेरणादायी कथा आणि विशेष उत्पादनांच्या आधारे १०० प्रवेशिकांमधून करण्यात आली. हे उद्योग हस्तकला दागिने तसेच चविष्ट पदार्थांपासून ते खास जीवनशैली उत्पादनांपर्यंत विविध प्रकारचे होते. त्यातून त्यांची महत्त्वाकांक्षा, नावीन्यपूर्णता, कलात्मकता आणि वैयक्तिक प्रवास दिसून आला.
महत्त्वाचे म्हणजे तीन उद्योग हर्ष चॉकलेट्स, द पॅटिना कंपनी आणि न्यूट्रिकॅसल यांची निवड नुवामाकडून दीर्घकालीन मदतीसाठी करण्यात आली. त्यातून महिला उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षांना प्रेरणा देण्याप्रति कंपनीची वचनबद्धता दिसून आली. ब्लू बिंदीच्या माध्यमातून नुवामाने आर्थिक ज्ञान व साधनांसह १००० पेक्षा अधिक महिलांचे सक्षमीकरण केले असून भारतभरातील महिलांसाठी खऱ्या संधी व विकास साध्य होऊ शकेल.
या उपक्रमाबाबत बोलताना नुवामा वेल्थचे अध्यक्ष आणि प्रमुख राहुल जैन म्हणाले की, “नुवामामध्ये आम्ही आर्थिक ज्ञान हा सक्षमीकरणाचा प्रमुख घटक असल्याच्या बाबीवर विश्वास ठेवतो. वी (WE) बाझार हा महिला उद्योजकतेच्या तत्वाचा उत्सव असून, त्यातून त्यांना आपल्या उद्योगाची वाढ करण्यासाठी व आपला व्यवसाय स्वतंत्र व शाश्वत करण्यासाठी स्त्रोत, मदत आणि मार्गदर्शन केले जाते. आमच्या ब्लू बिंदी प्रोग्रामद्वारे आम्ही महिलांना आर्थिक ज्ञान व आत्मविश्वासाने सक्षम करतो आणि त्यांना आपल्या आर्थिक भविष्याचे नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करतो.”