थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात
देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि गरमागरम पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणात अनेक वेगवेगळ्या पदार्थांची रंगतदार मेजवानी बनवली जाते. पण नेहमीच डाळभात किंवा तोच ठराविक पुलाव भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट पावटा भात बनवू शकता. या भातात तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता. गरमागरम चवीचा पावटा भात जर जेवणात असेल तर चार घास जास्त जातात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर पावटे उपलब्ध असतात. पावट्यांपासून आमटी, भाजी इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. हा भात तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पावटा भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)






