(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
RBI Penalty on Bank : पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी बहुतेक लोक बँकांवर विश्वास ठेवून पैसे जमा करता. व्याज आणि नफा मिळवण्यासाठी आपली बचत बँकांमध्ये जमा करतात. याव्यतिरिक्त, अनेक लोक गरजेनुसार बँकांकडून कर्जही घेतात. पण जरा विचार करा जर आरबीआयने कोणत्याही कारणास्तव, तुमचे खाते असलेल्या बँकेवर कारवाई केली, तर ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. असाच काहीसा प्रकार नुकताच घडलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI बँक ऑफ बडोदावर दंड आकारला आहे. या दंडामागील कारण जाणून घ्या.
RBI च्या चौकशीत असे उघड झाले की, बँकेने काही अनिवार्य KYC आणि कर्जदारांसाठी असलेल्या योग्य व्यवहार संहितेचे पालन केले नाही, ज्यामुळे दंड आकारण्यात आला. याव्यतिरिक्त, चौकशीत असेही उघड झालंय की काही कर्ज खात्यांवर विहित मर्यादेपेक्षा जास्त व्याजदर आकारण्यात आले होते. तसेच, काही ग्राहकांची केवायसी कागदपत्रे वेळेवर अपलोड केली गेली नव्हती. यासगळ्याचा दणका बँकेला बसलेला पाहायला मिळाला आहे. याचा परिणाम ग्राहकांवर कशा प्रकार होणार का ? हा प्रश्न आहे.
RBI च्या चौकशीत पालनातील त्रुटी उघड झाल्या, त्यानंतर RBI ने बँक ऑफ बडोदाला स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटीस बजावली. RBI ला हे आरोप खरे आढळले आणि बँकेवर ६३.६० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.
बँकेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने ही कारवाई केली आहे.
त्यामुळे, या दंडाचा ग्राहकांच्या बँक खात्यांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.
ग्राहकांना सध्या बँकेकडून मिळत असलेल्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
या कारवाईचा ग्राहकांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.






