आठवडाभरात 54 हजार कोटींची शॉपिंग; ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर तूटून पडलेत ग्राहक!
सणासुदीचा काळ असून सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा चांगला व्यवसाय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फेस्टिव्ह सीझन सेल सुरू आहे. अनेक उत्पादने मोठ्या सवलती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्म्सवर सणासुदीचा हंगाम सुरू होऊन, अवघा एक आठवडा उलटला आहे. या एका आठवड्यात देशभरातील नागरिकांनी जवळपास 54 हजार कोटींहून अधिक रुपयांची खरेदी केली आहे. जी आजपर्यंतची एक विक्रमी खरेदी ठरली आहे. दरम्यान, दिवाळीपर्यंत हा आकडा एक लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
54500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी
सणासुदीच्या काळात लोक नेहमीच मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग करत असतात. डेटाम इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, अहवालानुसार, चालू आठवड्यात 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत लोकांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून, तब्बल 54500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या काळात मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी सर्वाधिक झाली आहे.
हे देखील वाचा – इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील विक्रीचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे. यात 30 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या फोनची जास्त विक्री झाली आहे. त्याचवेळी ग्राहकांना अशा फोनलाही पसंती मिळाली आहे. जी कंपन्या मोठ्या डिस्काउंटमध्ये विकत आहेत. नवीन आयफोन मॉडेल्स लाँन्च झाल्यामुळे, जुन्या मॉडेल्सच्या किमतीही कमी झाल्या आहेत. ज्यामुळे विक्रीत वाढ झाली आहे.
ही होती खरेदीची पद्धत
डबल-डोअर रेफ्रिजरेटर आणि स्मार्ट टीव्हीच्या विक्रीतही वाढ झाली आहे. अर्ध्याहून अधिक खरेदीदारांनी ईएमआय पेमेंटची निवड केली आहे. ॲमेझॉनने अहवाल दिला आहे की, सुमारे 70 टक्के प्रीमियम स्मार्टफोन विक्री टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून आली आहे.
दोन दिवसांत जोडलेत 11 कोटी नवीन ग्राहक
ॲमेझॉनवर जेव्हा ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2024 सुरू झाला. तेव्हा अवघ्या 48 तासांत एक नवीन विक्रम झाला. ॲमेझॉननुसार, पहिल्या 48 तासात ॲमेझॉनमध्ये 11 कोटी नवीन ग्राहक जोडले गेले. यातील 80 टक्के ग्राहक टियर 2 शहरे आणि लहान शहरांमधील होते. या एका आठवड्यात विकल्या गेलेल्या सर्व स्मार्टफोन्सपैकी 75 टक्क्यांहून अधिक ग्राहक हे टियर 2 आणि टियर 3 शहरांतील होते.