काय घडलं नेमकं?
सोनम प्रजापती असं मृत महिलेचे नाव समोर आले आहे. ती तिच्या पतीसोबत देव ग्रीन सिटीमध्ये राहत होती. दोघांना तीन मुलं असल्याची असल्याची माहिती आहे. रविवारी त्याच्या मोबाईलच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. पती म्हणाला की, त्याची पत्नी सतत त्याचा मोबाईल मागत होती आणि त्याने मोबाईल देण्यास नकार देऊन तो झोपण्यासाठी गेला. मात्र, सोमवारी सकाळच्या सुमारास घराबाहेर त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळला.
महिन्याभरा पूर्वी वाद
प्राथमिक तपासात समोर आलं की, पती आणि पत्नीमध्ये पूर्वी सुद्धा मोबाईलवरून वाद झाला होता. जवळपास, एक महिन्यापूर्वी अशाच वादातून पत्नीने मोबाईल जमिनीवर आपटून तो तोडून टाकला होता. त्यानंतर रविवारी वाद झाला.
प्राथमिक तपासात काय समोर
पीडित सोनमने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पती-पत्नी मूळ जबलपूरचे रहिवासी असून ते मागील बऱ्याच वर्षांपासून भोपाळमध्ये राहत होते. सध्या, पीडितेच्या कुटुंबियांसह शेजारी राहणाऱ्या लोकांचे सुद्धा जबाब नोंदवले जात आहेत. आता पोलीस पोस्टमॉर्टमची प्रतिक्षा करत असून त्यातूनच महिलेच्या मृत्यूमागचं नेमकं कारण समोर येईल. संबंधित घटना भोपाळच्या कलजीखेडा परिसरात घडल्याची माहिती आहे.
भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक
मध्य प्रदेशातील रेवा येथे, पोलिसांनी अखेर पत्नीच्या खाजगी क्षणांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पतीला अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी बराच काळ फरार होता, परंतु पोलिसांनी त्याला रेवा येथे अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Ans: भोपाळच्या कलजीखेडा परिसरात ही घटना घडली.
Ans: पतीचा मोबाईल देण्यास नकार दिल्याने वाद झाल्याचे सांगितले जाते.
Ans:






