प्रकाश आंबेडकर यांनी पीएम नरेंद्र मोदींवर Epstine Files मध्ये नाव असल्याचा गंभीर दावा केला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबईत वंचित बहुजन आघाडीने मोदी सरकारविरोधात काढलेल्या मोर्च्याचा उल्लेख करत आंबेडकर म्हणाले की, “एपस्टिन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय शेतकऱ्यांविषयी असलेली भाषा बदलली. आतापर्यंत एपस्टिन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मुजरा’ केलाय एवढीच माहिती बाहेर आली आहे. त्यात अजून काही माहिती आहे का? याचा खुलासा मोदींनी करावा. जगात ज्यांचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आले त्यावर त्या देशांनी कारवाई करून जेलमध्ये टाकले. भारतात कोणाच्याच विरोधात कारवाई नाहीये. आरएसएसचे मोहन भागवत यावर गप्प का?” असा धक्कादायक सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा
प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना थेट इशारा दिला आहे की, “एप्रिल महिन्यापर्यंत त्यांच्याशी संबंधित दोन ‘रिल्स’ सार्वजनिक केले जातील. पंतप्रधान मोदी, एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर या रिल्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील, तर मोदींनी सन्मानाने खुर्ची रिकामी करावी. भारताचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी भाजपने मोदींना पायउतार करावे,” असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
हे देखील वाचा : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “चार महिन्यांपूर्वीची मोदींची भाषण बघा. आणि एपस्टिन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांबाबत भाषा बघा. आधी म्हणत होते की आम्ही भारतीय बाजारपेठ खुली करणार नाही. मात्र आता म्हणत आहे की भारताची बाजारपेठ ही जगासाठी खुली असणार आहे. देशातील ३५ टक्के जनता अद्याप दारिद्र्य रेषेखाली जगत असताना मोदींचे काही महिन्यांपूर्वीचे भाषण आणि प्रत्यक्ष करार यात मोठी तफावत आहे. अमेरिकेसोबतच्या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू असल्याचा घणाघातही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.






