Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?

तीव्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर हात पसरले आहेत. पाकिस्तानने अमेरिकेकडे थेट ९६ हजार कोटी रुपयांच्या मदतीची/निधीची मागणी केली आहे. पाकिस्तानला अचानक एवढ्या मोठ्या निधीची गरज का भासली?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 22, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानने अमेरिकेसमोर पुन्हा पसरली झोळी!
  • 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी
  • अचानक का पडली एवढ्या पैशांची गरज?
जागतिक स्तरावर तणावाची परिस्थिती असताना मध्यस्थीसाठी चर्चांना पुढे असणाऱ्या पाकिस्तानचीच परिस्थिती काय आहे असा प्रश्न पडतो. पैशासाठी अत्यंत संघर्ष करत असलेल्या पाकिस्तानने आता अमेरिकेकडे मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानने अमेरिकेकडे तब्बल १० अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे ९६,००० कोटी रुपयांची मागणी केली आहे. आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या पैशाचा वापर करण्याचा पाकिस्तानचा मानस आहे. पाकिस्तान दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे आणि आता अशा वेळी अमेरिकेकडे ही मदत मागितली आहे, जेव्हा ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बेलआउट कार्यक्रमांतर्गत आधीच कार्यरत आहे.

भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी! EbixCash World Money ला RBI चा कायमस्वरूपी परवाना; MSME आणि नागरिकांना मोठा दिलासा

कर्जावर जशीतशी सुरु आहे अर्थव्यवस्था

२०२३ मध्ये पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. तेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) मिळालेल्या ३ अब्ज डॉलर्सच्या आपत्कालीन पॅकेजने त्यावेळी पाकिस्तानला वाचवलं. त्यानंतर, पाकिस्तानने IMF कडून ७ अब्ज डॉलर्सचे आणखी एक मोठे कर्ज मिळवले. पण हे कर्ज मिळवण्यासाठी अट अशी होती की, पाकिस्तानला सार्वजनिक उत्पन्नावरील सरकारी कर वाढवावे लागतील. या सगळ्याचा परिणाम पाकिस्तानात महागाईचा भडका उडाला.

पाकिस्तानची आणखी एक मोठी समस्या

पाकिस्तानची आणखी एक मोठी समस्या ही आहे की, त्याचा परकीय चलन साठा चीन आणि सौदी अरेबियासारख्या मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जावर अवलंबून आहे. या परिस्थितीत, अमेरिकेकडून १० अब्ज डॉलर्सची विनिमय स्थिरीकरण सुविधा मिळाल्यास पाकिस्तानला भरीव आर्थिक मदत मिळेल.

यामागे पाकिस्तानची नवी खेळी

अलीकडील लष्करी संघर्षादरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटींमध्ये मध्यस्थी करण्याच्या भूमिकेनंतर पाकिस्तानने ही विनंती केली आहे. अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थी केल्यामुळे पाकिस्तानचे राजनैतिक स्थान मजबूत झाले आणि आता अमेरिकेकडून अधिक मजबूत आर्थिक मदत मिळू शकेल, अशी आशा निर्माण झाली. कदाचित याच कारणामुळे पाकिस्तानचे अर्थमंत्री, मुहम्मद औरंगजेब यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांची भेट घेतली आणि १० अब्ज डॉलर्सच्या ‘बायलेटरल एक्सचेंज स्टॅबिलायझेशन सपोर्ट फॅसिलिटी’शी विनंती केली.

सामान्य कर्जापेक्षा वेगळे का?

हे पारंपरिक कर्ज नसून, एक चलन अदलाबदल म्हणजेच करन्सी स्वॅप आहे. याअंतर्गत, अमेरिकेची ट्रेझरी पाकिस्तानला कोणताही निधी दान करत नाही किंवा मागत नाही, तर पाकिस्तानी रुपयांच्या बदल्यात अमेरिकन डॉलर्समध्ये तात्पुरती अदलाबदल करते. यातून हे दिसून येते की देशाला अल्प-मुदतीची डॉलरची हमी आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही वाढतो आणि देशात परदेशी गुंतवणूक पुन्हा सुरू होते. यामुळे पाकिस्तान IMF च्या कठोर नियम अटींमधूनही मोकळा होतो.

वाढतं वय कळूनच येणार नाही, कोरियन ग्लास स्किनचे रहस्य भारतात! ईशा अंबानींचा नवा ब्यूटी स्ट्रोक; कुठे आणि कसा खरेदी कराल?

Web Title: Pakistan demands 96000 crore rupees from us know the reason behind huge financial aid marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • America
  • America and Pakistan
  • Business News
  • currency
  • IMF
  • international news
  • Iran Israel Conflict
  • Loan
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
2

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.