Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Land Records Scam : शासकीय मोजणीचे कोट्यवधी रुपये खासगी खात्यात? भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा कारनामा; बदलीनंतर भांड फुटलं!

Palghar Land Records Scam : पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय मोजणी शुल्काचा तब्बल २ कोटी १ लाख १४ हजार ६१६ रुपयांचा अपहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तत्कालीन उपअधीक्षक हेमवतीनंदन कुमावत यांनी हा निधी शासनाच्या खात्याऐवजी स्वतःच्या व इतर खात्यांत वळविल्याचा आरोप केले गेले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 10, 2026 | 11:39 AM
(फोटो सौजन्य - Chatgpt)

(फोटो सौजन्य - Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • शासकीय मोजणीचे कोट्यवधी रुपये खासगी खात्यात?
  • भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा कारनामा
  • बदलीनंतर फुटलं अधिकाऱ्याचं भांड
Palghar Land Records Scam : मोखाडा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय मोजणी शुल्काच्या तब्बल २ कोटी १ लाख १४ हजार ६१६ रुपयांच्या कथित अपहाराचे प्रकरण समोर आल्याने पालघर ( Palghar Land Records Scam ) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तत्कालीन उपअधीक्षक हेमवतीनंदन कुमावत यांनी विविध शासकीय मोजणी प्रकरणांतून जमा झालेली रक्कम शासनाच्या लेखाशीर्षांत जमा न करता स्वतःच्या खात्यात वळविल्याचा व अन्य व्यक्तीच्या नावाने धनादेशाद्वारे रक्कम काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मोखाडा पोलिसांनी कुमावत यांना अटक केली आहे.

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर

भूमी अभिलेख कार्यालयाकडून खासगी व शासकीय जमिनींची मोजणी केली जाते. रस्ता रुंदीकरणासाठीचे भूसंपादन, नदीजोड प्रकल्पासाठीचे भूसंपादन व वनहक्क दाव्यांतील वनपट्ट्यांची मोजणी यासाठी संबंधित विभागांकडून मोजणी शुल्क जमा केले जाते.

हा प्रकार २०२३ ते २०२६ कालावधीत घडल्याचा आरोप

नियमानुसार ही रक्कम शासनाच्या संबंधित लेखाशीर्षात चलनाद्वारे जमा होणे अपेक्षित असते. मात्र, तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मोखाडा भूमी अभिलेख कार्यालयाच्या बँक खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी मोठी रक्कम शासनाकडे जमा न झाल्याचा आरोप आहे.मोखाडा पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी सुरू आहे. हा प्रकार २०२३ ते २०२६ या कालावधीत घडल्याचा आरोप असल्याने या काळातील सर्व मोजणी प्रकरणांची स्वतंत्र तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘ई-मोजणी ‘तील कागदपत्रांवरही संशय

या प्रकरणात केवळ शासकीय रक्कम वळविण्याचाच आरोप नसून ई-मौजणी पोर्टलवर अपलोड करण्यात येणाऱ्या शासकीय कागदपत्रांच्या कथित बनावटपणाचाही मुद्दा समोर आला आहे. मोजणी शुल्क निश्चित करण्यासाठी व शुल्क भरल्याची खात्री देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एमटीआर फॉर्म क्रमांक ६ वे बनावट दस्तऐवज तयार करून ते ई-मोजणी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

धनादेशाद्वारे रक्कम काढल्याचा आरोप

तत्कालीन उपअधीक्षक कुमावत यांनी शासनाच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असलेली रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केल्याचा तसेच शुभम सुनील पावसे यांच्या नावाने धनादेशाद्वारे रक्कम काढल्याचा आरोप आहे. या सर्व व्यवहारांची बैंक नोंदी, धनादेश, ई-मोजणी पोर्टलवरील कागदपत्रे आणि संबंधित मोजणी प्रकरणांशी सांगड घालणे तपास यंत्रणेसमोर महत्त्वाचे ठरणार आहे.

बदलीनंतर उघडकीस आला प्रकार

कुमावत यांची बदली झाल्यानंतर पदावर आलेल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास शासकीय रक्कम आणि संबंधित नोंदींमध्ये तफावत आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारदार रवींद्र निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोखाडा पोलिसांनी कारवाई केली.

कथित गैरव्यवहार मोठ्या साखळीचा भाग ?

दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा कथित गैरव्यवहार हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे का, की या व्यवहारामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे, हा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार, धनादेश, बैंक खाते, शासकीय चलने आणि ई-मोजणी पोर्टलवरील कागदपत्रे हाताळताना कार्यालयीन पातळीवर कोणालाही याची कल्पना नव्हती का, याचाही तपास होणे आवश्यक आहे.

उच्चस्तरीय चौकशीची गरज

भूमी अभिलेख विभाग हा नागरिकांच्या जमीन हक्कांशी थेट संबंधित विभाग आहे. त्यामुळे येथे आर्थिक गैरव्यवहाराबरोबरच नोंदींच्या फेरफाराचा संशय निर्माण झाल्यास त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण कालावधीतील आर्थिक व्यवहार, मोजणी प्रकरणे, शासकीय चलने, ई-मोजणीवरील कागदपत्रे आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका यांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड

Web Title: Palghar land records scam 2 crore embezzlement deputy superintendent arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Business News
  • cyber scam
  • Marathi News
  • palghar
  • Palghar crime news
  • Palghar news
  • scam

संबंधित बातम्या

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड
1

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर
2

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी
3

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग
4

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.