20 दिवसांत पैसे दुप्पट, वर्षभरात 400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा; 3 रुपयांचा पेनी स्टॉक बनला रॉकेट!
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरणीचे सत्र सुरूच आहे. मात्र, असे असले तरी काही पेनी स्टॉक्स हे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देत आहे. यामध्ये काही स्टॉक्स हे सतत अप्पर सर्किटला देखील बसले जात आहे. असाच एक पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे. त्याची किंमत 3 रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये गुंतवणूकदारांची रक्कम अवघ्या 20 दिवसांत दुप्पट झाली आहे.
ओमांश एंटरप्राइजेस लिमिटे़ड असे या पेनी स्टॉकचे नाव आहे. जो सातत्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने ५ टक्के अपर सर्किट जाणवत आहे. मंगळवारी (ता.२०) देखील त्यात ५ टक्के अपर सर्किट होते. या शेअरची किंमत केवळ 2.69 रुपये इतकी आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – झोमॅटो की स्विगी..? कोणता शेअर बनवणार गुंतवणूकदारांना मालामाल! वाचा… एका किल्कवर
20 दिवसात पैसे दुप्पट
ओमांश एंटरप्राइजेस लिमिटे़ड या पेनी स्टॉकने केवळ 20 दिवसांत पैसे दुप्पट केले आहेत. 31 ऑक्टोबरला त्याच्या शेअरची किंमत 1.35 रुपये होती. आता त्याची किंमत 2.69 रुपये आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना अवघ्या 20 दिवसांत 100 टक्के परतावा दिला आहे.
एका महिन्याच्या कालावधीबद्दल विचार केल्यास या कालावधीत 149 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही महिन्याभरापूर्वी त्याचे 1 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते. तर आज ही गुंतवणूक वाढून 2.49 लाख रुपये झाली असती. म्हणजे केवळ एका महिन्यात तुम्हाला १.४९ लाख रुपयांचा नफा झाला असेल.
6 महिन्यांत 300 टक्के पेक्षा जास्त परतावा
ओमांश एंटरप्राइजेस या कंपनीच्या शेअर्सने 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याच्या शेअरची किंमत केवळ 60 पैसे होती. तेव्हापासून 348 टक्क्यांनी झेप घेतली आहे. त्यामुळे एखाद्या गुंतवणूकदाराने या कालावधीत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती. तर त्यातून सुमारे 4.5 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.
हे देखील वाचा – एसपीजेआयएमआरकडून लघु व्यवसाय उद्योजकांना सक्षम करण्यासाठी उपक्रम ‘सशक्त’ लॉंच
वर्षभरात भरली बॅग
बहुतेक पेनी स्टॉक्स एका वर्षात फार चांगला परतावा देत नाहीत. मात्र, या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. एका वर्षात 460 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या शेअरची किंमत केवळ 48 पैसे होती. अर्थात जर तुम्ही वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची गुंतवणूक 5.60 लाख रुपये झाली असती. म्हणजे 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीमुळे केवळ एका वर्षात 4.60 लाख रुपयांचा नफा झाला असता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)