नवी दिल्ली : EPF च्या बैठकीत (EPF Meeting) पीएफ व्याजदर (PF Interest Rate) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तो ८.५ टक्के होता, तो आता ८.१ टक्के करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, हा दर गेल्या चार दशकांतील म्हणजेच ४० वर्षांतील सर्वात कमी आहे. १९७७-७८ मध्ये EPFO ने ८ टक्के व्याज दिले होते. तेव्हापासून ते ८.२५ टक्के किंवा त्याहून अधिक आहे. EPFO ची दोन दिवसीय बैठक शुक्रवार, ११ मार्चपासून सुरू झाली, जी आज संपली, ज्यामध्ये EPF चे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
EPFO ने आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि मागील आर्थिक वर्षात ८.५ टक्के व्याज निश्चित केले होते. यापूर्वी २०१८-१९ मध्ये EPFO वर ८.६५ टक्के व्याज दिले जात होते. EPFO ने २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये देखील ८.६५ टक्के व्याज दिले होते. त्याच वेळी, २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के, २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के व्याजदर होता.
EPFO fixes 8.1 pc as rate of interest on EPF deposits for 2021-22: Sources
— Press Trust of India (@PTI_News) March 12, 2022
[read_also content=”राजस्थान : दुकानात बसला होता तरुण, बदमाश व्यक्तींनी जबरदस्ती गाडीत बसवून नेलं आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/crime/virl-video-cctv-miscreant-beating-man-property-police-rajasthan-jhunjhunu-know-the-full-story-details-here-nrvb-253674/”]
रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कमाईवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पीएफचे व्याजदर स्थिर ठेवता येऊ शकतात किंवा त्यात कपातही केली जाऊ शकते. आता त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.