When will PM Kisan's Rs 2000 arrive in farmers' accounts? (फोटो-सोशल मीडिया)
केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आहे. या योजनेतून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये टाकते. आत्तापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यासाठी विभागीय संकेतस्थळावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
काय आहे ही योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.
शेतकरी 19 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, 19 व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी जारी केले जातात. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
डोसेवाला बड्या कंपनीच्या सीईओला पडतोय भारी; कमाईचा आकडा वाचून चाट पडाल!
मोबाईल नंबर लिंक करा
– तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जा. म्हणजे सीएससी किंवा https://pmkisan.gov.in वर लॉग इन करा.
– ‘अपडेट मोबाइल नंबर’ पर्याय निवडा.
– शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि नवीन मोबाईल नंबर द्या.
– यानंतर पडताळणीसाठी विनंती सबमिट करा.
– अशा प्रकारे लाभार्थी त्यांच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकतात
PM किसानचा हप्ता कसा चेक कराल?
– पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
– ‘लाभार्थी स्थिती’ मुख्यपृष्ठावर जा. या ठिकाणी लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.
– तुमचा तपशील एंटर करा. ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक समाविष्ट आहे.
– तपशील सबमिट केल्यानंतर, वेबसाइटवर तुमची हप्त्याची स्थिती दिसेल.
PM किसान योजनेसाठी कसा कराल अर्ज?
– सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
– नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा
– विचारलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँक माहिती प्रविष्ट करा.
– फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या.






