आता कर्ज झाले स्वस्त (फोटो सौजन्य - iStock)
देशातील सर्वात मोठी असणारी दुसरी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक सध्या स्वस्त कर्ज देत आहे. वास्तविक PNB ने ‘मॉन्सून बोनान्झा 2025’ रिटेल लोन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ग्राहकांना माफक दरांमध्ये कर्ज देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे. यामध्ये ग्राहकांना कर्ज घेतल्यास अनेक सुविधा मिळणार असल्याचंही सांगण्यात आलंय. गृह कर्ज, कार कर्ज अधिक सुलभ आणि परवडण्याजोगे करण्याच्या उद्देशानाचे पीएनबीने हे पाऊल उचलले आहे.
या अभियानादरम्यान पंजाब नॅशनल बँक अनेक आकर्षक ऑफर घेऊन येत आहे. होम लोन आणि कार लोनवर प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्जदेखील पूर्णतः माफ असून 50 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतल्यास NEC/लीगल आणि व्हॅल्युएशन शुल्काचा पूर्ण खर्च बँक उचलणार आहे. याशिवाय कार्ट रेटवर 5 बेसिस पॉईंट्स (bps) ची विशेष ऑफर देण्यात येईल.
MCLR दरात किती कपात?
पंजाब नॅशनल बँकेने जुलैमध्ये त्यांचे MCLR दर 5 bps ने कमी केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की MCLR हा सर्वात कमी व्याजदर आहे ज्यावर बँक कर्ज देऊ शकते. म्हणजेच, बँका यापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाहीत.
PNB चा ओव्हरनाईट MCLR ८.२५% वरून ८.२०% पर्यंत कमी झाला आहे. एका महिन्याचा MCLR ८.४०% वरून ८.३५% पर्यंत कमी झाला आहे. तीन महिन्यांचा MCLR ८.६०% वरून ८.५५% पर्यंत कमी झाला आहे. सहा महिन्यांचा MCLR ८.८०% वरून ८.७५% पर्यंत कमी झाला आहे. गृहकर्जासाठी सामान्यतः वापरला जाणारा एक वर्षाचा MCLR ८.९५ वरून ८.९०% पर्यंत कमी झाला आहे. तीन वर्षांचा MCLR ९.२५ वरून ९.२०% पर्यंत कमी झाला आहे. याचा अर्थ गृहकर्ज घेणाऱ्यांना आता कमी व्याज द्यावे लागेल.
Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत सोन्याच्या किंमती? जाणून घ्या सविस्तर
मिनिमम चार्जही काढण्यात आलाय
बँकेने आपल्या ग्राहकांना किमान शिल्लक रकमेतूनही सूट दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेने बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक (MAB) न ठेवल्याबद्दल दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनबीने एका निवेदनात म्हटले आहे की ग्राहकांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम १ जुलै २०२५ पासून लागू झाला आहे. याचा फायदा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना, महिलांना आणि शेतकऱ्यांना होईल. आता ते दंडाच्या भीतीशिवाय बँकिंग सेवा सहजपणे वापरू शकतील.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, UPS की NPS? संभ्रमात असलेल्यांना दिलासा
टीपः गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. जर तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी Navarashtra.com जबाबदार राहणार नाही.