रतन टाटा यांना नोएल टाटा यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास नव्हता? बायोग्राफीतून अनेक गोष्टी समोर
भारतीय उद्योग क्षेत्रातील चमकता तारा रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची सूत्र आली. नोएट टाटा आता टाटा ट्रस्टचे चेअरमन झाले. म्हणजेच 165 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचे टाटा ग्रुपचे कंट्रोल नोएल टाटा यांच्याकडे आले आहे. नोएल टाटा यांच्यासंदर्भात रतन टाटा यांचा विचार काय होता? यासंदर्भात एका पुस्तकातून खुलासा समोर आला आहे.
टाटा उद्योग समूह जगभर पोहचवण्यात दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्यानंतर आता ही जबाबदारी नोएल टाटा यांच्या खांद्यावर आली आहे. मात्र, रतन टाटा यांचा आपला सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या नेतृत्वावर विश्वास नव्हता, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून समोर आले आहे.
‘रतन टाटा ए लाइफ’ या पुस्तकात थॉमस मॅथ्यू यांनी लिहिले आहे की, 2011 मध्ये रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यावेळी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तेव्हा त्यात नोएल टाटा यांचाही समावेश होता. परंतु रतन टाटा यांचा समावेश या समितीत नव्हता. त्यांच्या उत्तराधिकारी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या निवड समितीपासून ते दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर त्यांना या निर्णयाचा पश्चाताप झाला.
हे देखील वाचा – अदानी समूहाचा मोठा करार, ही कंपनी विकत घेण्याची घोषणा; खुली ऑफरही जाहीर!
रतन टाटा का राहिले निवड समितीपासून दूर
पुस्तकात असे म्हटले आहे, की रतन टाटा निवड समितीपासून दूर राहिले. कारण टाटा समूहातील अनेक उमेदवार होते. एक सामूहिक संस्था एकमताने घेतलेल्या निर्णयावर आधारित त्यांच्यापैकी एकाची शिफारस करेल, असे त्यांना आश्वासित करायचे होते. निवड समितीपासून दूर राहण्याचे दुसरे कारण वैयक्तिक होते. कारण, असे मानले जात होते की त्यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा हे त्यांच्यानंतरचे नैसर्गिक उमेदवार आहेत. कंपनीतील पारशी आणि परंपरावादी समाजाच्या दबावादरम्यान, नोएल टाटा यांना ‘आपल्यापैकी एक’ मानले जात होते.
रतन टाटा यांनी काय म्हटले?
टाटा कंपनीतील पारशी आणि इतर समाजाच्या दरम्यान नोएल टाटा यांना स्वतःचे मानले जात होते. परंतु रतन टाटा यांच्यासाठी केवळ व्यक्तीची प्रतिभा आणि मूल्ये महत्त्वाची होती. तसेच समितीने नोएल टाटा यांची शिफारस केली नसती तर नोएल यांना रतन टाटा यांनी विरोध केला, असे वाटले असते. पुस्तकातील माहितीनुसार, रतन टाटा म्हणाले की, सर्वोच्च पदासाठी नोएल यांना अजून अनुभव कमी आहे. त्यांना यापेक्षा जास्त अनुभव असायला हवा होता. नोएल यांच्या ठिकाणी माझा मुलगा असला तरी मी असे काही केले असते की तो उत्तराधिकारी होऊ शकला नसता, असे रतन टाटा यांनी म्हटले होते. कदाचित, यामुळेच रतन टाटा यांनी नोएल टाटा यांच्याऐवजी सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदी बसवले होते.