भारतीय रिझर्व्ह बॅंकेने UPI ( युपीआय) वापरकर्त्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयच्या निर्णयानुसार UPI Lite द्वारे ऑफलाइन डिजिटल पेमेंटची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. अंतर्गत UPI वॉलेटची मर्यादा 2000 रुपयांवरून 5000 रुपयांपर्यंत वाढवली गेली आहे.’UPI Lite’ (युपीआय लाईट) प्रति व्यवहार मर्यादा ही सध्या 500 रुपये होती त्यामध्येही वाढ करण्यात आली असून ती 500 रुपयांवरुन 1000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पेमेंट मोडवर कधीही ऑफलाइन व्यवहाराची एकूण मर्यादा 2000 रुपये आहे. याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे युपीआ लाईटद्वारे वापरकर्ते 5000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात, त्यामुळे प्रत्येक लहान पेमेंट त्यांच्या बँक स्टेटमेंटमध्ये दिसणार नाही.
आरबीआयचे युपीआय अधिक सुलभ करण्यासाठी महत्वाचे पाऊल
भारतीय रिझर्व्ह बँक ने युनिफाइड पेमेंट इंटरफेस सुलभ करण्यासाठी तसेच सामान्य लोकांसाठी ते अधिक सुलभ होण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आयबीआयच्या परिपत्रकानुसार UPI लाइटची वाढलेली मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी 1000 रुपये असेल आणि एकूण मर्यादा कधीही 5000 रुपये असेल.
UPI लाइट म्हणजे काय?
युपीआय लाईट हे NPCI द्वारे सादर केलेले UPI ॲप्समधील ऑनलाइन वॉलेट आहे जे तुम्हाला तुमचा UPI पिन न वापरता पैशांचा व्यवहार करू देते. हे युपीआय लाईट Google Pay, PhonePe आणि BHIM सारख्या विविध युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ॲप्समध्ये उपलब्ध आहे.
UPI Lite ची वैशिष्ट्ये-
1. UPI पिनची गरज नाही
छोट्या रकमेच्या व्यवहारांकरिता वापरकर्त्यांना त्यांचा UPI पिन वापरण्याची आवश्यकता नाही.
2. ऑफलाइन मोड
UPI लाइट या ऑफलाइन व्यवहारांकरिता NFC तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या व्यव्हारांवर काही मर्यादा आहेत.
3. कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
UPI Lite द्वारे व्यवहाराकरिताकोणतेही शुल्क आकारत नाही.
4. KYC आवश्यकता नाही
वापरकर्त्यांना त्यांची केवायसी पडताळणी करण्याची आवश्यकता नाही.
5.ॲपमध्ये रेकॉर्ड
UPI Lite व्यवहार फक्त ॲपमध्ये रेकॉर्ड केले जातात, बँक स्टेटमेंटवर नाही.
UPI Lite चा वापर कसा करावा ?
1. नोंदणी
जर तुम्हाला युपीआय लाइटचा वापर करायचा असल्यास तुम्हाला Google Pay किंवा BHIM इत्यादी सारखे निवडक ॲप डाउनलोड करावे लागेल आणि युपीआय लाइट सक्रिय करण्यासाठी तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल. या ॲप्सचे विद्यमान वापरकर्ते थेट निधी त्याचा वापर सुरू करू शकतात.
2. निधी वॉलेटमध्ये अॅड करणे
वापरकर्ता त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून पैसे UPI Lite वॉलेटमध्ये अॅड करु शकतो.
3. पेमेंट करणे
एकदा फंड वॉलेटमध्ये अॅड केल्यानंतर वापरकर्ते त्यांचा UPI पिन न वापरता प्रति व्यवहार 1000 रुपयांचे छोटे व्यवहार करू शकतात.






