YONO 2.0 Launch: खराब नेटवर्कमुळे ऑनलाइन पेमेंटला येतो अडथळा? आता काळजी नाही; SBI ने आणलंय नवं पेमेंट अॅप (फोटो-ट्वीटर)
YONO 2.0 Launch: तुमचे खराब नेटवर्कमुळे ऑनलाइन पेमेंट होत नाही, तर आता काळजी करायची गरज नाही. कारण, SBI ने त्यांचे नवे पेमेंट अॅप YONO २.० लाँच केले, जे कमकुवत नेटवर्कवर देखील काम करेल. आणि Google Pay आणि PhonePe शी थेट स्पर्धा करेल. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी सविस्तर..
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांचे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुधारित करण्यासाठी YONO २.० लाँच केले आहे. हे नवीन अॅप पूर्वीपेक्षा खूपच हलके, वेगवान आणि स्मार्ट आहे. बँकेने ते Google Pay आणि PhonePe सारख्या आघाडीच्या UPI अॅपना आव्हान देण्यासाठी डिझाइन केले आहे. आता, लाखो ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्वोत्तम बँकिंग आणि पेमेंट सेवा उपलब्ध असतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच, हे अॅप एसबीआयच्या खात्याशिवाय देखील पेमेंट करेल. त्यामुळे इतर बँकेचे ग्राहक हे अॅप वापरू शकतील. आणि त्यांना ऑनलाइन पेमेंटचा चांगला अनुभव घेता येईल.
हेही वाचा: Global Indian Investors: भारतीय गुंतवणूकदारांची जागतिक झेप; परदेशी गुंतवणूक वाढली चारपट
इंटरनेटचा वेग कमी किंवा खराब असताना देखील हे अॅप सुरक्षित पेमेंट करेल. डिजिटल वापरकर्ता आधार ९६ दशलक्षांवरून २०० दशलक्ष पर्यंत वाढवण्याचे बँकेचे अध्यक्ष सी.एस. शेट्टी यांचे उद्दिष्ट आहे. कमी मेमरी असलेल्या फोनवरही हे अॅप सहजतेने काम करेल. कनेक्टिव्हिटी समस्या असूनही ग्राहकांचे व्यवहार अडकणार नाहीत याची खात्री करण्यासाठी बँकेने आपला संपूर्ण इंटरनेट बँकिंग कोड पुन्हा लिहिला आहे. तसेच, बँकेने UPI स्टॅक पूर्णपणे पुन्हा रीडिझाइन केला असून बॅलन्स चेक, मनी ट्रान्सफर, बिल पेमेंट आणि मर्चंट पेमेंट आता पूर्वीपेक्षा सोपे आणि अधिक सुरक्षित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
बँक स्व: ग्राहकांना आणि इतर ग्राहकांना मदत करण्यासाठी, आणि डिजिटल सपोर्ट देण्यासाठी बँक मार्चपर्यंत देशभरातील शाखांमध्ये १०,००० फ्लोअर मॅनेजर तैनात करणार असून, याव्यतिरिक्त योनो ३.० लाँच करण्याची घोषणा देखील केली आहे, जे भविष्याच्या तयारीसाठी साधेपणा आणि सुलभतेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
योनो २.० अॅप कसे वापरावे?
Ans: SBI चे YONO 2.0 पेमेंट अॅप इंटरनेटचा वेग कमी किंवा खराब असताना देखील हे सुरक्षित पेमेंट करेल.
Ans: नाही. SBI चे YONO 2.0 पेमेंट अॅप वापरासाठी एसबीआयचे ग्राहक नसले तरी इतर बँक ग्राहक या पेमेंट अॅपचा वापर करू शकतात. त्यामुळे हे इतर ग्राहकांसाठी सोईस्कर होईल.
Ans: प्ले स्टोअर वरून 'योनो एसबीआय' अॅप डाउनलोड करा. तुमच्या लोकेशनसाठी परवानगी देऊन बँकेत नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन निवडा. तुमचा खाते क्रमांक आणि जन्मतारीख दाखल करा. ओटीपी पडताळणी करून एटीएम पिन वापरून पासवर्ड सेट करा.






