सीमेन्स लिमिटेड आणि टाटा स्ट्राइव्ह यांनी व्यावसायिक प्रशिक्षणात गाठला महत्त्वाचा टप्पा, १.२ लाखांहून अधिक तरुणांना केले सक्षम (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सीमेन्स लिमिटेड आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त Dual VET (व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण) प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गेल्या आठ वर्षांत या उपक्रमामुळे देशभरातील 279 शासकीय आयटीआय मधून 120,000 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. उद्योगांच्या गरजा आणि आयटीआय मध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणातील महत्त्वाची तफावत भरून काढणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सुनिल माथूर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सीमेन्स लिमिटेड म्हणाले, “सीमेन्समध्ये आमचे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची वचनबद्धता हे आमच्या दीर्घकालीन धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही शिक्षण, समाज आणि पर्यावरण ह्या तीन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आहे. आमचे उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यावर भर देत नाहीत, तर शिक्षण आणि नवकल्पना यांद्वारे समुदायांना सक्षम सुद्धा करतात. आमचे सीएसआर प्रकल्प हे दीर्घकालीन असून समाजासाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेले आहेत, आणि आजपर्यंत निर्माण झालेला सकारात्मक प्रभाव याचे उत्तम उदाहरण आहे.”
पाम तेल उत्पादनात भारताची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल, देशांतर्गत लागवडीला प्रोत्साहन
एस. रामदोराई, टाटा स्ट्राइव्ह च्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष एस. रामादोराई म्हणाले “ITI हे भारताच्या कौशल्य विकास प्रणालीतील एक महत्त्वाचे स्तंभ आहेत आणि ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांमध्ये त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. प्रशिक्षणातून रोजगारापर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी ITI संस्थांना बळकट करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. सीमेन्स आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्यातील सहकार्य हे दीर्घकालीन भागीदारी काय साध्य करू शकते याचे उत्तम उदाहरण आहे. हा मॉडेल केवळ स्केलेबल नाही, तर अत्यावश्यकही आहे आणि उद्योग सहभागामुळे व्यावसायिक प्रशिक्षणात कसा बदल घडवता येतो याचे प्रभावी उदाहरण आहे.”
अमेय वंजारी, मुख्य परिचलन अधिकारी (COO), टाटा स्ट्राईव्ह यांनी पुढे सांगितले, “हा उपक्रम ITI प्रणालीला बळकट करत असून उद्योग आणि प्रशिक्षणार्थ्यांमधील अंतर कमी करत आहे. आतापर्यंत १ लाख २० हजार तरुण प्रशिक्षणार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. ITI मध्ये प्रणालीगत बदल घडवून आणून, हा परिणाम केवळ तात्पुरता न राहता दीर्घकालीन आणि व्यापक व्हावा, हे आमचे उद्दिष्ट आहे.”
Dual VET उपक्रम ITI प्रशिक्षणावर दोन टप्प्यांत सकारात्मक परिणाम करतो. एकीकडे, ITI प्रशिक्षकांना उत्तम अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये चौकशी आधारित शिकण्यास आणि प्रोजेक्टवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. दुसरीकडे, स्थानिक उद्योगांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येते, जेणेकरून ते प्रशिक्षणार्थ्यांना उद्योग आधारित प्रत्यक्ष प्रशिक्षण – उदा. ‘इन-प्लांट ट्रेनिंग’ देऊ शकतील आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रवासात भागीदार बनू शकतील.
या सहयोगाच्या माध्यमातून सीमेन्स लिमिटेड आणि टाटा स्ट्राइव्ह यांनी भारतातील व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. या उपक्रमाचा उद्देश ITI प्रशिक्षण आणि उद्योग यांच्यातील दुवा मजबूत करून एक शाश्वत कौशल्य व रोजगार साखळी निर्माण करणे आहे, जे प्रशिक्षणार्थीला उद्योगासाठी तयार करते.
पहिल्या तिमाहीत Zomato चा नफा ९० टक्के घसरला, महसूल ७० टक्के तर शेअर ५ टक्के वाढला