Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायलेंट अटॅक… गेल्या 15 दिवसांत ‘या’ वस्तूंच्या किमती गुपचूप वाढल्या आणि तुम्हाला कळलंच नाही? लगेच तपासा यादी

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या अलीकडील वाढलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत झाले आहे. लोक महागाईबद्दल बरीच तक्रार करताहेत. पण माहिती आहे का? या मोठ्या गोष्टींचा विचार करता लहान गोष्टींकडे आपण लक्षच दिला नाही. ज्यांनी आपल्या खिशाला कधीच कात्र लावली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 16, 2026 | 01:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Inflation Last 15 days : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या अलीकडील वाढलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत झाले आहे. लोक महागाईबद्दल बरीच तक्रार करताहेत. पण माहिती आहे का? या मोठ्या गोष्टींचा विचार करता लहान गोष्टींकडे आपण लक्षच दिला नाही. ज्यांनी आपल्या खिशाला कधीच कात्र लावली आहे. गेल्या १५ दिवसांत इतर अनेक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत, ज्याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित माहिती नसेल. चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांनी मागील १५ दिवसांत आपला दर बदलला आणि महाग झाल्यात.

महागाई वाढली तरीही कमी बजेटमध्ये करा विमान प्रवास! स्वस्त तिकीट देण्यासाठी Air India चा नवा फंडा?

FMCG उत्पादनांच्या किमती वाढल्या

कच्च्या मालाच्या किमतीत ११% तर पॅकेजिंग खर्चात ५६% वाढ झाल्यामुळे, HUL, डाबर, मॅरिको आणि कोलगेट यांसारख्या आघाडीच्या FMCG कंपन्यांनी उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. Dove आणि Pearsसारखे प्रीमियम ब्रँड ४-५ टक्क्यांनी महाग झाले आहेत. डिटर्जंटच्या किमतीतही ५-११% वाढ झाली आहे. या महागाईच्या काळात तोंडाची काळजी घेणे अधिकाधिक कठीण झाले आहे. कोलगेटपासून डाबरपर्यंत अनेकांनी त्यांच्या टूथपेस्टच्या किमती वाढवल्या आहेत.

दुग्धजन्य पदार्थ महागले

गेल्या काही दिवसांपासून अमूल गोल्डचे १-लिटरचे पॅकेट महाग झाले आहे. त्याची किंमत आता ६८ रुपयांवरून ७० रुपये झाली आहे. अमूल ताझाची किंमतही ५५ रुपयांवरून ५७ रुपये झाली आहे. मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची (१ लिटर) किंमत ६९ रुपयांवरून ७२ रुपये झाली आहे. त्याचबरोबर, मदर डेअरीच्या म्हशीच्या दुधाच्या दरातही ५ रुपयांची वाढ झाली असून, त्याची किंमत पूर्वी ७५ रुपये प्रति लिटरवरून ८० रुपये झाली आहे.

स्वयंपाक करणंही महागलं

घाऊक बाजारात मालवाहतुकीच्या दरात झालेल्या वाढीचा इतका परिणाम झाला आहे की, किरकोळ विक्रेत्यांनी सुटा तांदूळ आणि डाळींचे दर प्रति किलो ५-७ रुपयांनी वाढवले ​​आहेत. मॅरिकोने आपल्या प्रमुख खाद्यतेल, सफोलाच्या दरात ६-११ टक्क्यांनी वाढ केली आहे. दरम्यान, भाजीपाला दरातही वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत टोमॅटोचे दर प्रति किलो ३०-४० रुपयांवरून ६०-७० रुपये झाले आहेत. कांदे, आले, हिरवी मिरची आणि लिंबू यांच्या दरातही वाढ झाली आहे. वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे बटाटे, वांगी आणि भेंडी यांसारख्या इतर भाज्यांच्या दरातही ५-१० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जेवण कसं करायचं हा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे.

हॉटेलचं जेवणंही महागलं

बाहेर जेवणेही महाग झाले आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल्समधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. महागाईचा दर ५.७५% वर पोहोचला आहे. उत्पादन खर्च वसूल करण्याच्या प्रयत्नात, रेस्टॉरंट मालकांनी गेल्या महिन्यात त्यांच्या मेन्यूच्या किमती १.८% ने वाढवल्या आहेत.

Multibagger Stock: ‘हा’ शेअर बनला रॉकेल… 9 रुपयांवरुन थेट 600 रुपयांवर, एक लाखाचे झाले तब्बल 68 लाख

Web Title: Silent inflation list of essential items prices increased in last 15 days marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Business News
  • Commercial LPG
  • Diesel Petrol Price
  • High Inflation Rate
  • Inflation Increases
  • Inflation News
  • LPG
  • LPG Crisis
  • Marathi News

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.