(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Air India : महागाईचा भडका आणि वाढत्या ताण या सगळ्यात आपण कुठे प्रवासाला जायचा विचारच करत नाही. जरी विचार केला तरीही विमान प्रवास हा खिशाला परवडण्यासारखा नाही म्हणून आपण प्लॅनच कॅन्सल करतो. पण आता असं करायची गरज नाही. वाढलेल्या तिकीटांच्या अडचणीवर Air India ने फंडा शोधून काढला आहे. नेमका काय जाणून घेऊयात.
Multibagger Stock: ‘हा’ शेअर बनला रॉकेल… 9 रुपयांवरुन थेट 600 रुपयांवर, एक लाखाचे झाले तब्बल 68 लाख
एअर इंडिया प्रवाशांसाठी एक नवीन, अधिक किफायतशीर तिकीट श्रेणी सुरू करण्याचा विचार करत आहे. ही योजना निवडक कमी अंतराच्या मार्गांवर लागू केली जाऊ शकते, ज्यामध्ये विमानात जेवण नको असणाऱ्या प्रवाशांसाठी कमी दर आकारले जातील. प्रवाशांना विमानातील जेवणासाठी पैसे न देता प्रवास करता येईल. पण हा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे आणि मंजूर झाल्यास, तो केवळ देशांतर्गत प्रवाशांसाठीच लागू करण्यात येऊ शकतो.
सूत्रांनुसार, या कल्पनेचा विचार प्रवाशांच्या दृष्टिकोनातून केला जात आहे. ज्या प्रवाशांना प्रवासादरम्यान जेवण करायचे नाही, त्यात ते no meals हा पर्याय निवडून टिकीट सिलेक्ट करु शकतात. त्यामुळे तुम्ही रोजच्या दरांपेक्षा कमी दरांमध्ये तिकीटं बुक करु शकता त्यामुळे तुमचा पैसा वाचेल. याचा प्रवाशांच्या खिशावरही कमी भार पडेल. एअर इंडिया आधीपासूनच विविध fare categories उपलब्ध करून देते, आणि प्रस्तावित पर्याय प्रवासाचा खर्च कमी करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर एअरलाइन सुरुवातीला निवडक कमी अंतराच्या देशांतर्गत मार्गांवर हा पर्याय सादर करू शकते. याचे भविष्य ठरवण्यसाठी विमानप्रवासाशी निगडीत प्रवाशांच्या प्रतिक्रिया महत्त्वाची भूमिका बजावतील. ग्राहकांच्या प्रतिक्रियांच्या आधारे, एअरलाइन एकतर ही श्रेणी अधिक देशांतर्गत मार्गांवर विस्तारित करू शकते किंवा तिची उपलब्धता मर्यादित करू शकते.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी प्रस्तावित ‘जेवणाशिवाय तिकीट मिळेल याची शक्यत नाही. जरी या योजनेला मंजुरी मिळाली, तरी ती केवळ देशांतर्गत विमानसेवेपुरताच मर्यादित असणार आहे. सध्या, एअर इंडिया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांवरील सर्व प्रवाशांना जेवण देते.






