एसबीआय कार्डने फोर्स मार्कमध्ये 2 कोटी कार्ड्सचा टप्पा ओलांडला; डिजिटल इंडियाला बळ!
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) म्युच्यूअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी एसबीआय क्वाँट फंड ही नवीन समभाग गुंतवणूक फंड योजना आणली आहे. मुदतमुक्त श्रेणीतील ही योजना क्वाँट तत्वावर आधारित गुंतवणूक करणार आहे. एसबीआय म्युच्यूअल फंडाने स्वतः विकसित केलेल्या क्वाँट प्रारुपाआधारे समभाग आणि समभाग आधारित साधनांमध्ये गुंतवणूक करत दीर्घ कालावधीत भांडवलाची वृध्दी साध्य करणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. परंतु योजनेचे गुंतवणूकीचे उद्दीष्ट साध्यच होईल, याबाबत कोणतीही खात्री देता येत नाही. या फंडासाठी बीएसई २०० टीआरई हा आधारभूत निर्देंशाक राहणार आहे.
एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंद किशोर या नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना म्हणाले आहे की, “देशातील सर्वात मोठे फंड हाऊस म्हणून आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना नवनवीन गुंतवणूक पर्याय प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत. घटक आधारित गुंतवणुकीचे विकसित होत असलेले विश्व वैविध्यपुर्ण त्याचबरोबर जोखीमेचे उत्तम प्रकारे समायोजन करत परताव्याच्या लक्षणीय संधी प्रदान करते.
बहु-घटक गुंतवणुकीत केवळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जात नाही. त्याऐवजी विविध घटक एकत्र केले जातात. त्याआधारे परताव्याचे चक्र सुलभ होत जाते आणि घटक निवडताना वर्तणूकीमुळे निर्माण होणारे पूर्वाग्रह कमी होतात. आमचा एसबीआय क्वाँट फंड हा गती, मूल्य, गुणवत्ता आणि वाढ या घटकांचा समावेश असलेल्या स्वविकसित बहु घटक प्रारुपावर आधारित आहे. तसेच जोखीमेचे अतिशय उच्च प्रकारे समायोजन करत परतावा मिळविण्याच्या उद्देशाने पोर्टफोलिओला विविधतेची जोड देण्याची धोरणात्मक संधी गुंतवणूकदारांना प्रदान करतो.”
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना दिलाय छप्परफाड परतावा; रिअल इस्टेट क्षेत्रात ते
एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचे उप व्यवस्थापकीय संचालक आणि सह सीईओ डी. पी. सिंग म्हणाले, भारताच्या वृध्दीच्या वाटचालीवर ठाम विश्वास असलेल्या आणि नियमांवर आधारित गुंतवणूकीच्या चौकटीच्या माध्यमातूम ठराविक कालावधीत पुनरावलोकनाचा लाभ घेत समभागांमध्ये गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एसबीआय क्वाँट फंड हा एक उत्तम पर्याय आहे. विशिष्ट जोखीम/परताव्याचे स्वरुप असलेल्या प्रस्थापित समभाग घटकांचे एकत्रीकरण करत गुंतवणूकदारांना इष्टतम जोखीम-समायोजित परतावा प्रदान करणे आणि वर्तणुकीतील पूर्वाग्रह कमी करणे, हे या फंडाचे उद्दीष्ट आहे.
एसबीआय क्वाँट फंड स्वविकसित
बहु घटक (मल्टी-फॅक्टर) प्रारूपाचा वापर करतो. या प्रारुपामध्ये विविध बाजार चक्रांमध्ये कार्यप्रदर्शन अधिकाधिक उंचावण्यासाठी गती, मूल्य, गुणवत्ता आणि वाढ यासारख्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. हा फंड प्रामुख्याने आपला निधी अशा प्रकारे गुंतवतोः अ) आपला ८० ते १०० टक्के निधी संख्यात्मक प्रारुपाआधारे निवडलेल्या समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये गुंतवतो, तर शिल्लक निधीची पुढीलप्रमाणे गुंतवणूक करतोः ब) या व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या समभाग आणि समभाग-संबंधित साधनांमध्ये 0 – 20% क) ० ते २० टक्के निधी ऋण रोखे आणि रोख्यांशी संबंधित साधने (सुरक्षित कर्जासह (रोखे प्रकारात योजनेच्या २० टक्क्यांपर्यंत) आणि रोखे डेरिव्हेटीव्हज) तसेच त्रिपक्षीय रेपोसह चलन बाजारातील साधने ड) ० ते १० टक्के निधी हा रिटस् आणि इनव्हीटसच्या युनिटमध्ये सेबीने वेळोवेळी निर्धारित केलेल्या निर्बंधानुसार गुंतविला जाणार आहे.
हा फंड अन्य म्युच्यूअल फंडांच्या (स्थानिक आणि विदेशी इटीएफसह) युनिटसमध्ये आपल्या निव्वळ निधीतील २० टक्क्यांपर्यंतचा निधी गुंतविणार आहे. हा फंड एडीआर/जीडीआर/विदेशी इक्विटी, विदेशी इटीएफ आणि रोखे साधने यासारख्या विदेशी साधनांमध्ये (सिक्युरिटीज) नियमांच्या अधीन राहत गुंतवणूकीच्या संधी शोधू शकतो. ही गुंतवणूक योजनेच्या निव्वळ मालमत्तेच्या 35% पेक्षा जास्त असणार नाही आणि वेळोवेळी उपलब्ध कमाल मर्यादेनुसार असेल. मालमत्ता वाटपाच्या अधिक तपशीलांसाठी गुंतवणूकदारांनी कृपया योजना माहिती दस्तऐवज वाचावा. एसबीआय क्वाँट फंडाचे फंड व्यवस्थापक हे श्रीमती सुकन्या घोष आणि श्री प्रदीप केसवान (विदेशी गुंतवणूकीसाठीसाठी समर्पित निधी व्यवस्थापक) असतील.