Stocks to Watch: TCS, IREDA सह हे स्टॉक असतील तेजीत, कारण काय? जाणून घ्या? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Stocks to Watch Marathi News: बुधवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. बुधवारी सेन्सेक्स ८३,६२५ वर उघडला आणि दिवसअखेर ०.२१ टक्क्यांच्या घसरणीसह ८३,५३६ वर बंद झाला. दुसरीकडे, बुधवारी निफ्टी ५० २५,५१४ वर उघडला आणि दिवसअखेर ०.१८ टक्क्यांच्या घसरणीसह २५,४७६ वर बंद झाला.
शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता असताना गुंतवणूकदार विनाजोखीम गुंतवणूक पर्याय शोधत आहे. सद्या शेअर बाजारात ट्रम्प यांच्या शुल्काची भीती आहे, त्यामुळे शेअर बाजारात सतत चढ उतार सुरू आहे. अशा परिस्थितीत, गुरुवारी बाजार उघडेल तेव्हा गुंतवणूकदार विविध कारणांमुळे खाली दिलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकतात.
गुरुवारी बाजार उघडेल तेव्हा गुंतवणूकदारांचे लक्ष आयटी कंपनी टीसीएसच्या शेअरवर असेल. तथापि, बुधवारी या शेअरमध्ये घसरण झाली आणि तो ०.५९ टक्क्यांच्या घसरणीसह ३,३८६ रुपयांवर बंद झाला. याचे कारण म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) उद्या म्हणजेच १० जुलै रोजी २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
गुरुवारी बाजार उघडेल तेव्हा गुंतवणूकदारांचे लक्ष सरकारी कंपनी IREDA च्या शेअरवर असेल. तथापि, बुधवारी या शेअरमध्ये घसरण झाली आणि तो ०.१७ टक्क्यांच्या घसरणीसह १६६ रुपयांवर बंद झाला. याचे कारण म्हणजे भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था उद्या म्हणजेच १० जुलै रोजी २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
गुरुवारी बाजार उघडेल तेव्हा गुंतवणूकदारांचे लक्ष टायर उत्पादक कंपनी एमआरएफच्या शेअरवर असेल. बुधवारी या शेअरमध्ये वाढ झाली आणि तो ४ टक्क्यांच्या वाढीसह १,५०,६९० रुपयांवर बंद झाला. याचे कारण म्हणजे बुधवारी या शेअरने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
टायर कंपनी एमआरएफच्या शेअर्समध्ये गेल्या चार महिन्यांत सुमारे ४२ टक्के वाढ झाली आहे. चार महिन्यांत एमआरएफचे शेअर्स ४४३२२ रुपयांनी वाढले आहेत. १० मार्च २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स १,०६,५५७ रुपयांवर होते. ९ जुलै २०२५ रोजी एमआरएफचे शेअर्स १५०८७९.३० रुपयांवर बंद झाले.
गुरुवारी बाजार उघडेल तेव्हा गुंतवणूकदारांचे लक्ष ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सीमेन्स एनर्जी इंडियाच्या शेअरवर असेल. बुधवारी या शेअरमध्ये वाढ झाली आणि तो २.६६ टक्क्यांच्या वाढीसह ३,१२८ रुपयांवर बंद झाला. याचे कारण म्हणजे बुधवारी या शेअरने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
गुरुवारी बाजार उघडेल तेव्हा गुंतवणूकदारांचे लक्ष रासायनिक क्षेत्रातील कंपनी नॅविन फ्लोरिन इंटरनॅशनलच्या शेअरवर असेल. बुधवारी या शेअरमध्ये वाढ झाली आणि तो १.३९ टक्क्यांच्या वाढीसह ५,११० रुपयांवर बंद झाला. याचे कारण म्हणजे बुधवारी या शेअरने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
वेदांत ग्रुपवर आर्थिक हेराफेरी आणि दिवाळखोरीचा आरोप, व्हाइसरॉय रिसर्च अहवालात आणखी काय? जाणून घ्या