Chhatrapati Sambhajinagar ZP Elecction: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महिला 'राज'; ६३ पैकी ३१ जागांवर महिला उमेदवारांचा डंका
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! तिकीट बुकिंग रखडलं तरी पैसे सुरक्षित; IRCTC ने लाँच केलं खास फीचर
यापूर्वी राज्यातील नगर परिषद, त्यानंतर महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक घेण्यात आली. या जिल्हयात भाजपच्या सर्वाधिक १२ महिला विजयी झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूरमधून मुलतानी माहिन इद्रीस, आमखेडा येथून पुष्पाबाई प्रकाश काळे, सिल्लोड तालुक्यातील केन्हाळातून अनिता मोठे, कन्नड तालुक्यातील हातनूरमधून मिनाक्षी किशोर पवार, जेहमधून मंजूषा जयेश मलदोडे, खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगीमधून प्रतीक्षा विकास कापसे, गदानामधून रेखा प्रकाश चव्हाण, गंगापूर तालुक्यातील सावंगीतून संगीता संदीप आमराव, शिल्लेगावातून सविता संतोष जाधव, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाडमधून साधना रवींद्र कुलकर्णी, दौलताबामधून लंकाबाई रानोबा जाधव, पिंप्री बु. मधून जयश्री परमेश्वर पवार या भाजपच्या महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.
त्याखालोखाल शिंदेसेनेच्या सिल्लोड तालुक्यातील अजिंठ्यातून आयशाबेगम नासीर हुसेन सय्यद, शिवन्यातून निकीता राजेंद्र काळे, घाटनांद्रामधून आशा अर्जुन गाडे, अंधारीतून मंगल केशवराव तायडे, वैजापूर तालुक्यातील संवदगामधून निता दिपकसिंग राजपूत, लासूरगावातून संगीता सुभाष तांबे, गंगापूर तालुक्यातील तुर्काबादमधून स्वाती योगेश पाटेकर, पैठण तालुक्यातील आडूळ बु. मधून रूपाली अभिजीत पवार, दावरवाडीतून जयश्री राजू वाघमोडे आणि डोरकिनमधून राधिका दिलीप जगताप यांनी विजय मिळविला आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगावमधून सुनीताबाई चंद्रशेखर चव्हाण, कन्नड तालुक्यातील कुंजखेडामधून सुनंदा अण्णासाहेब चव्हाण, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटीमधून ललिता सुरेश सोनवणे, पंढरपूरमधून विदया रमेश गायकवाड या चार महिला विजयी झाल्या आहेत.
या निवडणुकीत जिल्हयातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गंगापूर तालुक्यातील नेवरगावमधून वैजयंती वाल्मीक सिरसाठ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फुलंब्री तालुक्याती पालमधून गितंजली वरूण पाचीकर या विजयी झाल्या आहेत. याशिवाय कन्नड तालुक्यातील नागद गटातून काँग्रेसच्या तूप्ती दिलीपसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगावमधून प्रहारच्या ज्योती सुधाकर शिंदे, तर वैजापूर तालुक्यातील वाकलामधून पार्वतीबाई रामहरी जाधव आणि गंगापूर तालुक्यातील जामगावमधून दीपा सचिन मुंदडा या आपक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत.






