कधीकाळी एका खोलीत राहून काढलेत दिवस; आज आहे 10046 कोटींचा मालक! वाचा... त्यांची यशोगाथा
जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. अशीच काहीशी यशोगाथा आहे सूरतच्या अश्विन देसाई यांची. अश्विन यांच्या आयुष्यात एक काळ असा होता. ज्यावेळी ते अपार्टमेंटमध्ये एका खोलीत राहत होते. मात्र, आज त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांची एकूण संपत्ती 10046 कोटी रुपये आहे. ते एथर इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. 2013 मध्ये त्यांनी या कंपनीची पायाभरणी केली आणि कंपनीच्या लिस्टिंगमुळे अश्विन देसाई अब्जाधीश झाले.
२०१३ मध्ये सुरु केली कंपनी
अश्विन देसाई यांनी 2013 मध्ये एथर इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना केली होती. आज ही कंपनी ॲग्रोकेमिकल्स, फार्मास्युटिकल्स त्याचप्रमाणे तेल आणि वायू यांसारख्या उद्योगांना विशेष रसायनांचा पुरवठा करणारी प्रमुख कंपनी बनली आहे. अथरचे गुजरातमध्ये दोन कारखाने असून, देसाई यांची मुले रोहन आणि अमन व्यवसाय संचालन आणि तांत्रिक बाबी हाताळतात. याशिवाय त्यांची पत्नी पोर्णिमा या बोर्डाच्या सदस्या आहेत.
जून 2022 मध्ये देसाई यांनी त्यांची कंपनी पब्लिक केली आणि 103 कोटी डॉलर जमा केले. कंपनीचे शेअर्स 10 टक्के प्रीमियमसह शेअर बाजारात लिस्ट झाली आणि यामुळे देसाई अब्जाधीश बनले.
ईव्ही वित्तपुरवठ्यासाठी JSW MG Motor इंडियाची Kotak Mahindra Prime सोबत भागीदारी
प्रवासाला कशा प्रकारे झाली सुरुवात?
अश्विन देसाई यांचा हा प्रवास 1976 मध्ये सुरू झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या एका नातेवाईकासोबत खास केमिकल्सचा व्यवसाय सुरू केला. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, देसाई आपल्या आईसोबत सुरतला गेले होते. तिथे त्यांची भेट या नातेवाईकाशी झाली. यानंतर देसाई यांनी आपल्या व्यवसायाला शून्यापासून सुरुवात केली.
एका खोलीत राहून काढले दिवस
सुरतमध्ये एका खोलीच्या अपार्टमेंटमध्ये राहत असताना, देसाई यांनी शहराच्या जवळपास विहिरीसह एक लहान शेत भाड्याने घेतले होते. या ठिकाणी त्यांनी सल्फरिल क्लोराईडचे उत्पादन सुरू केले. हे एक अतिशय धोकादायक अकार्बनिक कंपाऊंड आहे. त्यावेळी भारतात आयात होत होती.
बिझनेसचा होतोय विस्तार
अश्विन देसाई यांचा एथर इंडस्ट्रीजचा अजूनही विस्तारत होतोय. कंपनीने सुरतमध्ये आणखी एका कारखान्यासाठी नवीन जागा घेतली असून, ते सुरतचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सुरतचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती फारुख जी पटेल आहेत. त्यांची एकूण संपत्ती 9,700 कोटी रुपये आहे. पटेल हे केपी ग्रुपचे मालक आहेत. एनजे इंडिया इन्व्हेस्टमेंटचे नीरज चोक्षी हे सुरतच्या अब्जाधीशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून ते 9,600 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.