(फोटो सौजन्य: pinterest)
टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सवर एक मोठा आणि धोकादायक सायबर हल्ला झाला असल्याचं म्हटलं जात आहे. रॅन्समवेअर हॅकर गट ‘वर्ल्ड लीक्स’ने टाटाच्या सिस्टीममध्ये घुसून जगातील दोन सर्वात मोठ्या टेक आणि ऑटोमोबाईल कंपन्या, ॲपल आणि टेस्ला, यांची गोपनीय व्यावसायिक गुपिते आणि घटकांची डिझाइन्स चोरल्याचा दावा केला आहे. या दोन्ही कंपन्या टाटा समूहाच्या ग्राहक आहेत. नेमकी काय आहे परिस्थिती? समजून घेऊयात.
Hormuz मध्ये 4 महिन्यांपासून अडकले होते LPG ने भरलेले 2 टँकर्स; संधी मिळताच भारताकडे रवाना!
टाटा इलेक्ट्रॉनिक्सने या सायबर हल्ल्याची पुष्टी केली आहे. एका निवेदनात टाटा इलेक्ट्रॉनिक्सने म्हटले आहे, “काही आठवड्यांपूर्वी, टाटा इलेक्ट्रॉनिक्सला त्यांच्या काही सिस्टीममध्ये काही हालचाल जाणवली. आमची सुरक्षा प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आणि या घटनेचा आमच्या व्यवसायावर किंवा कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही.” सूत्रांनुसार, हॅकर्सनी डेटा न हटवण्याच्या किंवा सार्वजनिक न करण्याच्या बदल्यात टाटा समूहाकडे मोठ्या खंडणीची मागणीही केली आहे.
सुरक्षा संशोधकांच्या मते, वर्ल्ड लीक्स या हॅकर ग्रुपने टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या नेटवर्कमधून चोरलेल्या २ लाखांहून अधिक फाईल्स डार्क वेबवर अपलोड केल्या आहेत. यामध्ये एकूण ६३० गिगाबाईट्स (GTata Electronic B) पेक्षा जास्त डेटा लीक झाला असल्याचं बोललं जातंय. डार्क वेबवरील या डेटाच्या तपासणीतून असे समोर आले आहे की, त्यात ॲपल आणि टेस्लाच्या कामकाजाशी थेट संबंधित असलेल्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील फाईल्सचा समावेश असल्याचं बोललं जातं.
लीक झालेल्या डेटामध्ये “com.apple.factorydata” नावाचे फोल्डर्स होता. यामध्ये आयफोन सर्किट बोर्डच्या घटकांच्या गुणवत्ता तपासणीशी संबंधित ५२ पानांचा एक गोपनीय दस्तऐवज आहे. लीक झालेल्या फाइल्समध्ये टेस्लाच्या आगामी अपग्रेडेड मॉडेल वाय एसयूव्हीसाठीचे एनव्ही३६ चार्ज पोर्ट कंट्रोलर डिझाइन आणि टेस्लाच्या नवीन मॉडेल ३ सेडानची अभियांत्रिकी रेखाचित्रे देखील आहेत, ज्यावर स्पष्टपणे “व्यापार रहस्य” असे नमूद केलेले आहे. भारतीय सायबर सुरक्षा विश्लेषक राजशेखर राजाहरिया यांच्या मते, डार्क वेबवर उपलब्ध असलेल्या या फाइल्समध्ये केवळ कंपनीच्या डिझाइन्सचाच नव्हे, तर अनेक वर्षांचे ईमेल्स, इव्हेंट लॉग्स आणि टाटाच्या परदेशी कर्मचाऱ्यांच्या पासपोर्टच्या प्रतींचाही समावेश आहे.
या सायबर हल्ल्याचे आणि डेटा लीकचा दूरगामी परिणाम होऊ शकतात. चीनबाहेर भारताला एक नवीन उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या ॲपलच्या धोरणाला मोठा धक्का बसला आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण आयफोनपैकी जवळपास एक तृतीयांश (३३%) आयफोन एकटी टाटाच तयार करते. या गळतीमुळे होसूर येथील टाटाच्या मुख्य आयफोन असेंब्ली प्लांटच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेत टाटा इलेक्ट्रॉनिक्स एक प्रमुख भूमिका बजावते. भारतातील ॲपल आणि टेस्लासारख्या मोठ्या कंपन्यांची व्यावसायिक गुपिते उघड होणे, हे देशाच्या डिजिटल सुरक्षेसाठी आणि जागतिक कंपन्यांच्या विश्वासासाठी एक चिंताजनक चिन्ह आहे.
Share Market Crash : तब्बल 6000000000000 स्वाहा… शेअर मार्केट कोसळलं! सेन्सेक्स 700 अंकांनी लुढकला






