नवी दिल्ली : एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांना आणखी ५ वर्षांसाठी टाटा सन्सच्या (Tata Sons Executive Chairman) कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. (N ChandraSekaran Gets Second Term At Tata Sons) टाटा सन्स, टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. चंद्रशेखरन यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यासाठी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata)यांचा पाठिंबा मिळाला आहे. टाटा ट्रस्टची टाटा सन्समध्ये जास्त हिस्सेदारी आहे.
Tata Sons board renews N Chandrasekaran’s term as Executive Chairman for the next five years
(file photo) pic.twitter.com/txn1ZHuipV
— ANI (@ANI) February 11, 2022
टाटा सन्सतर्फे सांगण्यात आले की, त्यांच्या बोर्डाने शुक्रवारच्या बैठकीत गेल्या ५ वर्षांचा आढावा घेतला. तसेच एन चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. रतन टाटा या बैठकीसाठी खास उपस्थित होते. त्यांनी एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपच्या होत असलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. त्यांनी चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्याबाबत शिफारस केली.
[read_also content=”रस्ता ओलांडताना काळाने घात केला, नाशिकच्या सीबीएस परिसरात बसखाली येऊन विद्यार्थिनीचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/khandesh/nashik/student-died-in-bus-accident-at-nashik-nrsr-236579/”]
टाटा सन्सच्या कार्यकारी मंडळाने कार्यकारी अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कामाचे कौतुक केले. चंद्रशेखरन यांच्या पुन्हा नियुक्ती करण्याच्या निर्णयाला सगळ्यांनी संमती दर्शवली. चंद्रशेखरन म्हणाले की, गेल्या ५ वर्षांचा टाटा ग्रुपचा प्रवास पाहून मला पुन्हा संधी देण्यात आली आहे, याचा मला आनंद आहे.
चंद्र नावाने प्रसिद्ध चंद्रशेखरन यांनी टाटा सन्ससाठी काम करायला २०१७ मध्ये सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळातील बहुतांश काळ सायरस मिस्त्री यांच्याशी कायदेशीर लढाई करण्यातच गेला. चंद्रशेखरन ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या कार्यकारी मंडळावर आले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना अध्यक्ष बनवण्यात आले. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या कार्यभार सांभाळला.