पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा(फोटो-सोशल मीडिया)
Sri Lanka has announced its squad against Pakistan : टी-२० विश्वचषकापूर्वी, श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. या पाकिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेने आपला संघ जाहीर केला आहे. दासुन शनाकाकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.श्रीलंकेच्या संघात अनुभवी खेळाडू आणि नवीन चेहऱ्यांचे मिश्रण दिसून येत आहे. ही मालिका आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून या स्पर्धेच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे.
हेही वाचा : ICC T20 Ranking : टी-20 क्रमवारीत दीप्ती शर्माला फटका! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पहिल्या क्रमांकावर मारली बाजी
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ७ जानेवारी रोजी खेळला जाणार असून दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे ९ आणि ११ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. तिन्ही सामने दांबुला या शहरात खेळले जातील. या मालिकेनंतर, श्रीलंका टी-२० विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर करणार आहे. या संघातील काही खेळाडूंना श्रीलंकेच्या मागील प्राथमिक विश्वचषक संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते.
पाकिस्तानविरुद्धच्या या टी-२० संघात २०२४ च्या टी-२० विश्वचषक संघातील तेरा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, पथुम निस्सांका, धनंजय डी सिल्वा, कामिंदू मेंडिस, नुवान तुषारा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, महेश थीकशाना, दुनिथ वेल्लागे आणि दुष्मंथा चामीरा या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेचे लक्ष्य पाकिस्तानला पराभूत करण्याचे असेल
विश्वचषक ही मोठी स्पर्धा जवळ येत असून पाकिस्तानविरुद्धची ही मालिका श्रीलंकेला त्यांच्या संघ संयोजनात सुधारणा करण्यासाठी मोठी महत्वाची असणार आहे. शेवटच्या वेळी जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते, तेव्हा पाकिस्तान संघाने रावळपिंडीमध्ये खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत बाजी मारली होती. श्रीलंकेचा संघ गुण निश्चित करण्याच्या उद्देशाने स्पर्धेत प्रवेश करणारा आहे.
विश्वचषक २०२६ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची ४० दिवसांच्या कालावधीसाठी जलद गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निस्सांका, कामिल मिशारा, कुसल मेंडिस, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, चरिथ असलंका, जानिथ लियानागे, कामिंदु मेंडिस, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेलालागे, ट्रेविन मॅथ्यू, महेश थेक्साना, दुष्मंथा चामीरा, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा, इशान मलिंगा.






