(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत वैद्यकीय खर्चाचा दावा करू शकता. तथापि, यासाठी काही अटी आहेत. पहिली अट अशी आहे की, हा खर्च ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या उपचारासाठी झालेला असावा. दुसरी अट अशी आहे की, त्यांच्या नावावर कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी नसावी.
आयकर नियमांनुसार, विमा नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय उपचारांवर झालेला खर्च कर कपातीसाठी पात्र आहे. पण यात काही अपवाद आहेत. आयकर कायद्यात याला ‘ज्येष्ठ नागरिकांवरील वैद्यकीय खर्च’ म्हटले जाते.
पालकांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असावे आणि त्यांच्याकडे आरोग्य विमा नसावा. तुम्ही त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी वार्षिक ₹५०,००० पर्यंत दावा करू शकता. तुमचे पालक तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणे आवश्यक नाही. जरी त्यांना स्वतःची पेन्शन किंवा उत्पन्न असले तरी, तुम्ही तुमच्या बँक खात्यातून त्यांची वैद्यकीय बिले किंवा विम्याचे हप्ते भरल्यास कर कपातीचा दावा करू शकता.
जर तुम्ही किंवा तुमचे जोडीदार ज्येष्ठ नागरिक वर्गात मोडत असाल आणि तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी नसेल, तरीही तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वैद्यकीय खर्चाकरिता दरवर्षी ५०,००० रुपयांपर्यंत दावा करू शकता.
हॉस्पिटलची बिले किंवा औषधांचा खर्च फक्त UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, किंवा नेट बँकिंग यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारेच भरणे आवश्यक आहे. रोखीत केलेल्या पेमेंटसाठी आयकर विभाग कोणतीही सूट देत नाही.






