भारतातील टॉप-10 श्रीमंतांची नावे समोर; फोर्ब्स मासिकाने केली यादी जाहीर, वाचा... सविस्तर!
आपल्या देशात कोण सर्वाधिक श्रीमंत आहे. हे जाणून घेण्याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. विशेष म्हणजे या श्रीमंतांबद्दल आणि त्यांच्या राहणीमानाबाबत अनेकांना आकर्षण असते. अशातच आता फोर्ब्स नुकतीच भारतातील श्रीमंताची नवी यादी जाहीर झाली आहे. ज्यामुळे आता देशातील सर्वात श्रीमंत १० व्यक्ती कोण आहेत? याबाबतची ताजी माहिती सर्वसामान्यांना समजणार आहे.
‘ही’ आहे देशातील टॉप-१० श्रीमंतांची यादी
१. मुकेश अंबानी : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. मुकेश अंबानी यांचे नाव देशातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे एकूण 124.2 बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे. जागतिक अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव 11 व्या क्रमांकावर आहे.
२. गौतम अदानी : अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जागतिक अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांचे नाव 20 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण मालमत्ता 83.0 बिलियन डॉलर्स इतकी आहे.
३. सावित्री जिंदल : भारतातील श्रीमंतांच्या यादीत तिसरे नाव सावित्री जिंदल यांचे आहे. ओपी जिंदल ग्रुपच्या सर्वेसर्वा सावित्री जिंदल 74 वर्षांच्या असून, त्यांची चार मुले संपूर्ण बिझनेसचा व्याप सांभाळतात. सावित्री जिंदल यांची एकूण मालमत्ता 41.8 बिलियन डॉलर्स आहे. जागतिक अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा 31 वा क्रमांक लागतो.
मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार कितीये? तुम्हाला माहितीये का..? आकडा ऐकून अवाक व्हाल!
४. शिव नादर : HCL Technologies चे संस्थापक शिव नादर हे भारतातील चौथे आणि जगातील 49 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. शिव नादर यांच्याकडे 34.1 बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे सन 2023 मध्ये शिव नादर यांनी 2042 कोटी रुपये दान केले होते.
५. दिलीप सांघवी : Sun Pharmaceutical Industries Ltd चे चेअरमन दिलीप सांघवी यांच्याकडे एकूण 25.8 बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे. दिलीप सांघवी हे भारतातील पाचव्या तर जगातील 71 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे.
६. कुमार बिर्ला : आदित्य बिर्ला ग्रुपचे सर्वेसर्वा कुमार बिर्ला हे देशातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. कुमार बिर्ला यांच्याकडे एकूण 23.7 बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे. जागतिक अब्जाधीशांच्या यादीत बिर्ला त्यांचे नाव 83 व्या क्रमांकावर आहे.
७. सायरस पूनावाला : Serum Institute of India चे मालक सायरस पूनावाला हे भारतातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत 89 व्या क्रमांकावर सायरस पूनावाला यांचे नाव आहे. सायरस पूनावाला यांचे वय 83 वर्षे असून, त्यांच्याकडे एकूण 22.4 बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे.
८. राधाकिशन दमानी : Avenue Supermarkets चे फाउंडर राधाकिशन दमानी हे 69 वर्षांचे असून, त्यांच्याकडे 21.6 बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे. भारतातील श्रीमंतामध्ये राधाकिशन दमानी हे 8 व्या क्रमांकावर आहेत. जागतिक अब्जाधिशांच्या यादीत दमानी हे 91 व्या क्रमांकावर आहेत. देशभरात त्यांचे 336 डी-मार्ट स्टोअर्स आहेत.
९. कुशाल पाल सिंह : DLF Limited चे चेअरपर्सन कुशाल पाल सिंह हे भारतातील सर्वात अनुभवी बिझनेसमन आहेत. कुशाल पाल सिंह यांच्याकडे एकूण 18.6 बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे. कुशाल पाल सिंह हे भारतातील नवव्या तर जगातील 102 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे.
१०. रवी जयपुरिया : भारतातील अब्जाधीशांच्या यादीत RJ Corp चे चेअरमन आणि मालक रवी जयपुरीया हे 10 व्या क्रमांकावर आहेत. रवी जयपुरीया यांच्याकडे एकूण 18.1 बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे. ते जगातील 106 क्रमांकाचे अब्जाधीश व्यक्ती आहे.






