फोटो सौजन्य सोशल मिडिया
Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन (टीअँडडी) क्षेत्रातील आघाडीच्या ईपीसी कंपनीने प्रामुख्याने आपल्या मुख्य देशांतर्गत ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायात ५७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नवीन ऑर्डर्स मिळवल्या आहेत. यात सिल्वासा येथील प्लांटमध्ये उत्पादित अत्याधुनिक कार्बन कोर एचटीएलएस कंडक्टरच्या साहाय्याने ट्रान्समिशन लाइन्सच्या रीकंडक्टरिंग कामांचा मोठा वाटा आहे.
मिळालेल्या या ऑर्डर्समध्ये ट्रान्समिशन लाइन्सचे ईपीसी आणि कंपनीच्या कारखान्यांमधून एचटीएलएस कंडक्टरच्या पुरवठ्यासह ट्रान्समिशन लाइन रीकंडक्टरिंग प्रकल्प, तसेच पोल्स इत्यादींच्या पुरवठ्याचा समावेश आहे. या नवीन ऑर्डर्स एचटीएलएस कंडक्टर उत्पादन आणि स्ट्रिंगिंगमधील कंपनीची क्षमता व कंडक्टर उत्पादन क्षमतेत नुकतीच केलेली ७० टक्के वाढ महत्त्वाची आहे, हे पुन्हा सिद्ध करतात. यामध्ये भारतातील अत्यंत मोठ्या खाजगी क्षेत्रातील विकासकाकडून मिळालेल्या ट्रान्समिशन लाइनच्या बांधकामासाठी एका ईपीसी कराराचाही समावेश आहे.
या नवीन ऑर्डर्ससह चालू वर्षातील एकूण ऑर्डर प्राप्ती १,६०९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तसेच कंपनी अतिरिक्त ६९४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्समध्ये एल१ ठरली आहे.
कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सशक्त बिडिंग पाइपलाइनचा लाभ घेत आहे. प्रबळ ऑर्डर बुक, सक्षम बिडिंग पाइपलाइन आणि वाढलेली उत्पादन क्षमता कंपनीच्या दीर्घकालीन वाढीच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते. आपल्या वाढत्या ऑर्डर बुकच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने आधीच आपली टॉवर उत्पादन क्षमता दुप्पट करून १,७२,४०० एमटीपीए केली आहे आणि कंडक्टर उत्पादन क्षमता ७० टक्क्यांनी वाढवून ४०,८०० केएमपीए केली आहे.
कंपनीचे एमडी आणि सीईओ रणदीप नारंग म्हणाले, “नुकतेच मिळालेल्या या ऑर्डर्स टीअँडडी क्षेत्रातील आमच्या अभियांत्रिकी, उत्पादन आणि प्रकल्प अंमलबजावणीच्या क्षमतेवर आमच्या अग्रगण्य ग्राहकांचा असलेला सातत्यपूर्ण विश्वास दर्शवतात. आम्हाला मिळालेल्या एचटीएलएस रीकंडक्टरिंग कामांमुळे मला खूप आनंद झाला आहे, कारण यामधून आमची बांधकाम उत्कृष्टतता, तसेच आमच्या प्रगत प्रॉडक्ट रेंजचेही सामर्थ्य दिसून येते. प्रबळ ऑर्डर बुक आणि सक्षम बिडिंग पाइपलाइन, तसेच टॉवर्स आणि कंडक्टर्समधील वाढलेल्या उत्पादन क्षमतेसह आम्हाला ट्रान्सरेलसाठी शाश्वत वाढीच्या महत्त्वपूर्ण संधी स्पष्टपणे दिसत आहेत.”






