चंद्रभागा प्रदूषणाच्या विळख्यात (फोटो- istockphoto)
चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा
पशू-पक्षी, भाविकांचे आरोग्य धोक्यात
नदी पात्रातील दूषित पाम्यामुळे मासे पडले मृत्यूमुखी
पंढरपूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा नदी प्रदषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रातील द्षित पाण्यामुळे जलचर प्राण्यांबरोबरच पशू-पक्ष्ांचा जीवही धोक्यात आला आहे. अलीकडेच नदी पात्रातील दूषित पाम्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याची घटनाताजी असतानाच आता नदींतील पाणी पाण्यामुळे काही पशु पक्षीही मृत पावल्याची घटना समार आली आहे. अशातच नदी पात्रातील प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोम्याचा प्रश्म पुन्हा एकदा एरणीवर आला आहै. माघी यात्रा तोंडावर असतानाच चंद्रभागेतील पाणी दुषीत झाल्याने भाविकांमधून तीज्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चंद्रभमागा नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने सेवर टेकनॉलँरीवा वापर केला आहे. पण ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे. या योजनेवर राज्य शासनाकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र तो खर्चही आता पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.
नमामि चंद्रभागा कागदावरच
राज्य सरकारने नमामि चंद्रभागा प्रकल्पाची घाोपणा केला आहे, मात्र ही योजना अजून ही कागदावरच आहे. येथील चंद्भभागेच्या पात्रात स्नानासाठी हजारो भाविक येतात, मात्र चंद्रभागा नदी प्रदूषित झाल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषित चंद्रभागा नदी स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर राहिले आहे.
शेवाळाचा थर, पाण्याला दुगंधी
सध्या नदी पात्रात मोठ्या प्रमागावर शेवाळाचा थर आला असून पाण्याला दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नदी पात्रात एका बदकाचा मृत्यू झाल्याची पटना समोर आली आहे. काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन चंद्रभागा नदी स्वच्छ व प्रदूषित मुक्त करावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा
तीर्थक्षेत्र आळंदीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून येणारे रसायनयुक्त सांडपाणी आणि मैलामिश्रित पाण्यामुळे नदीचे पात्र पुन्हा एकदा पांढऱ्या फेसाने ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडल्याची घटना ताजी असतानाच, आता फेसाळलेल्या पाण्यामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.






