फोटो सौजन्य - Social Media
पुढील आठवडा IPO साठी फार महत्वाचा मानला जात आहे. या आठवड्यात अनेक IPO खुले होणार आहेत तसेच काही IPO ची लिस्टिंग होणार आहे. एकंदरीत, एकूण ६ IPO ची लॉन्चिंग पुढील आठवड्यात केली जाणार आहे. तर १२ IPO ची लिस्टिंग केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात ७ SMI IPO आणि ५ मेनबोर्ड IPO आले होते. मुळात, पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या ६ IPO मधील ३ IPO SMI आहेत आणि उर्वरित ३ मेनबोर्ड IPO आहेत. एकंदरीत, १६ डिसेंबर ते २० डिसेंबरचा कार्यकाळ शेअरमार्केट आणि गुंतवणूकदारांसाठी फार महत्वाचा आहे.
ममता मशीनरी लिमिटेड
ममता मशीनरी लिमिटेडचा ₹179 कोटींचा बुक-बिल्ट इश्यू 19 डिसेंबर 2024 रोजी खुलणार असून, 23 डिसेंबर 2024 पर्यंत खुला राहील. या इश्यूमध्ये नवीन शेअर्सचा समावेश नाही; हे पूर्णपणे 74 लाख शेअर्सच्या विक्रीची ऑफर (OFS) आहे. शेअर वाटप 24 डिसेंबर 2024 रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे, आणि स्टॉक 27 डिसेंबर 2024 रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. बीलाइन कॅपिटल ऍडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार म्हणून कार्य करतील.
ट्रांसरेल लाइटिंग लिमिटेड
ट्रांसरेल लाइटिंग लिमिटेड, एक अग्रगण्य इंजीनियरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी, 19 डिसेंबर 2024 रोजी आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) सादर करीत आहे. या IPO अंतर्गत ₹400 कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील, तसेच प्रमोटर अजन्मा होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 1.01 कोटी शेअर्सची विक्री (OFS) केली जाईल. हा IPO इश्यू २३ डिसेंबर रोजी बंद होईल. IPO BSE तसेच NSE वर लिस्टिंग करण्यात येईल.
वेंटिव हॉस्पिटॅलिटी लिमिटेड
वेंटिव हॉस्पिटॅलिटी लिमिटेड, एक लक्झरी हॉटेल्सची मालकी असलेली कंपनी, 20 डिसेंबर 2024 रोजी आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) सादर करीत आहे. हा इश्यू 24 डिसेंबर 2024 पर्यंत खुला राहील. लिस्टिंग BSE आणि NSE वर केली जाईल. IPO ची साईज १६,००० कोटी आहे. २७ डिसेंबर रोजी IPO ची लिस्टिंग होईल. या IPO द्वारे उभारलेल्या निधीचा उपयोग मुख्यतः कंपनीच्या कर्जाची परतफेड किंवा पूर्व-परतफेड करण्यासाठी केला जाईल.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) 17 डिसेंबर 2024 रोजी खुला होणार असून 19 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. या IPO ची इश्यू साईज ₹10.01 कोटी इतकी आहे. BSE तसेच NSE द्वारे या IPO ची लिस्टिंग करण्यात येणार आहे. या IPO ची लॉट साईज 4,000 शेअर्स आहे.
आइडेंटिकल ब्रेन्स स्टूडियोज लिमिटेड
आइडेंटिकल ब्रेन्स स्टूडियोज लिमिटेड, एक प्रमुख VFX आणि CGI सेवा प्रदाता, 18 डिसेंबर 2024 रोजी आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) सुरू करणार आहे. तसेच २० डिसेंबर रोजी IPO बंद करण्यात येईल. या IPO ची साईज ₹19.95 कोटी आहे. या IPO ची लॉट साईज 2,000 शेअर्स आहे.
न्यूमलयालम स्टील लिमिटेड
न्यूमलयालम स्टील लिमिटेड 19 डिसेंबर 2024 रोजी आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) सुरू करणार आहे, जो 23 डिसेंबर 2024 पर्यंत खुला राहील. २७ डिसमेंबर रोजी या IPO ची लिस्टिंग होईल. तसेच २४ डिसेंबर रोजी शेअर अलोट केली जातील.