पोलीस भरती दरम्यान २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; वाचा... कुठे घडलीये घटना!
पोलीस भरती म्हटले तरुणांना क्रेझ असते ती पोलिसांच्या वर्दीची. ज्यासाठी अनेक तरुण आपले स्वप्न उराशी बाळगून जिल्ह्यांच्या ठिकाणी मैदानी चाचणी देण्यासाठी येत असतात. सध्या राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची शारीरिक चाचणी घेतली जात आहे. अशातच आता नवी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी आलेल्या सात जणांची मैदानी चाचणी घेताना प्रकृती खालावली होती. त्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अन सहा पैकी आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
रुग्नालयात जाण्याआधीच मृत्यू
अक्षय बिहाडे (वय 25) असे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील रहिवाशी असून, त्याने राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11, नवी मुंबई कॅम्पच्या सशस्र पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला होता. मात्र, शनिवारी (ता.२९) बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरु असताना सात तरुणांना चक्कर आले. ज्यामुळे त्यांना सर्वांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यातील अक्षय या तरुणाचा रुग्नालयात जाण्याआधीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अक्षय बिहाडे या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्याने मैदानी चाचणी दरम्यान काही घटकांचे सेवन केले होते. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे आता पोस्टमोर्टम रीपोर्टनंतरच अक्षयच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. पोलीस भरतीत यशस्वी होऊन कुटुंबाला हातभार लावावा, असे अक्षयचे स्वप्न होते. मात्र, आता त्याच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.