फोटो सौजन्य - Social Media
न्यू इंडिया एज्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ५०० रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. एकंदरीत, या भरतीच्या माध्यमातून असिस्टंटच्या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी newindia.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या भरतीसाठी आजपासून अर्ज करता येणार आहे. डिसेंबरच्या १७ तारखेपासून या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. तर जानेवारी २०२५ ची १ तारीख या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकंदरीत, उमेदवारांना या वर्षाच्या शेवटपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरतीच्या प्रक्रियेबद्दल:
११ डिसेंबर रोजी या भरती संदर्भात शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली होती. १७ तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये परीक्षेचा समावेश आहे. जानेवारी २०२५ तसेच मार्च २०२५ मध्ये या परीक्षांना आयोजित केले जाईल. दोन टप्प्यांमध्ये या परीक्षेला आयोजित केले जाईल. पहिला टप्पा २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात परीक्षा २ मार्च २०२५ रोजी आयोजित केली जाईल. नव्या वर्षाची पहिली दिनांक या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत आहे.
NIACL ने आयोजित केलेल्या या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या काही उमेदवारांना या अर्ज शुल्कात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. एकंदरीत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर PwBD या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही सारखीच रक्कम भरावी लागणार आहे. इतर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज करताना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज शुल्क म्हणून ८५० रुपयांची भरपाई करावी लागणार आहे.
अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत. तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे निश्चित करण्यात आलेले आहे. तर या भरतीसाठी जास्तीत जास्त ३० वय असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. . SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत अधिक ५ वर्षांची सूट देण्यात येईल. OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत अधिक ३ वर्षांची सूट देण्यात येईल तर PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अधिक १० वर्षांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भांत अधिक माहितीसाठी झहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.