फोटो सौजन्य: Social Media
खूप कमी असे कलाकार असतात, जे प्रेक्षकांना आपल्या कलेच्या जोरावर मंत्रमुग्ध करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजेच प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन. काल म्हणजेच 16 डिसेंबरला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसकोमध्ये झाकीर हुसेन यांचे हृदयासंबंधित आजराने निधन झाले आहे. यामुळे आता कलाविश्वात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
झाकीर हुसेन हे एक उत्तम तबलावादक होते, त्यांनी अनेक चित्रपटासाठी तबला वादन केले आहे. आपल्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा हा कलाकार आज आपल्यात नाही आहे. तबलावादक झाकीर हुसेन यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी तिथेच आपला शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे, फक्त कलाविश्वातच नाही तर दर्दी प्रेक्षकांमध्ये देखील हालहाल व्यक्त केली जात आहे. त्यांनी तबलावादनाने लाखो लोकांची मने जिंकली होती आणि पुढेही जिंकत राहील.
AI फक्त जॉब्स खाणार नाही तर देणार सुद्धा! ‘या’ फिल्ड्समध्ये असणार नोकरीची सुवर्ण संधी
झाकीर हुसैन हे महान तबला वादक अल्ला राख यांचे ज्येष्ठ पुत्र होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी भारतात आणि जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली. वृत्तानुसार, झाकीर हुसेन यांना त्याच्या कारकिर्दीत पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी तीन या वर्षाच्या सुरुवातीला 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये मिळाले होते. हुसेन यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांपैकी एक आहेत, ज्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
भारतीय तबला वादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. जर आपण झाकीर हुसैन यांच्या शिक्षणाबद्दल बोललो, तर त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण माहीम येथील सेंट मायकल हायस्कूलमधून केले आणि नंतर मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
उस्ताद झाकीर हुसेन यांनी केवळ 11 वर्षांच्या तरुण वयात अमेरिकेत त्यांची पहिली मैफिल सादर केल्याचे अहवालात म्हटले आहे. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला. ते केवळ भारतातच नव्हे तर देश-विदेशातील सर्वांचे आवडते तबलावादक होते.
झाकीर हुसेन हे एक प्रसिद्ध संगीतकार आहेत आणि त्यांनी भारतीय आणि पाश्चिमात्य संगीत शास्त्रांचे मिश्रण करून एक नवा संगीत प्रकार निर्माण केला. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.