फोटो सौजन्य - Social Media
आंध्र प्रदेश शालेय शिक्षण विभागाने (AP DSC 2025) राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 16,347 शिक्षक पदे भरली जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, 15 मे 2025 ही शेवटची मुदत आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ apdsc.apcfss.in यावर जाऊन अर्ज करावा. भरतीशी संबंधित सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे, जसे की पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, अर्जाची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची यादी.
या भरतीसाठी लेखी परीक्षा 6 जून आणि 6 जुलै 2025 रोजी घेण्यात येण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेला अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रिया काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने किमान 50% गुणांसह इंटरमिजिएट किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. SC, ST, BC व दिव्यांग उमेदवारांसाठी ही टक्केवारी 45% आहे. तसेच, उमेदवाराकडे 2 वर्षांचा D.El.Ed. डिप्लोमा किंवा 4 वर्षांचा B.El.Ed. पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची अटही महत्त्वाची आहे. अर्ज करताना 1 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 44 वर्षे असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन असून, उमेदवाराने संकेतस्थळावर जाऊन “Apply Online” लिंकवर क्लिक करून प्रथम रजिस्ट्रेशन करावे, नंतर लॉगिन करून अर्ज भरावा. अर्ज करताना आवश्यक माहिती व कागदपत्रे नीट भरावीत, शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याचा प्रिंटआउट ठेवावा.
अर्ज करताना चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी नोटिफिकेशन पूर्ण वाचणे अत्यंत आवश्यक आहे. भरतीसंबंधी नवीन अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट नियमितपणे पाहत राहणे गरजेचे आहे. ही भरती इच्छुक उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे सरकारी शिक्षक होण्याची.