विद्यार्थी(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : अबब! T20 क्रिकेटमध्ये ठोकले द्विशतक; 23 षटकारांची आतिषबाजी करत फलंदाजाने विरोधी संघाला केले उद्ध्वस्त
यंदा राज्यभरात पहिल्यांदाच अकरावी प्रवेशासाठी पूर्णपणे ऑनलाइन पद्धत लागू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत वारंवार आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे चार नियमित फेऱ्यांसह जवळपास नऊ विशेष फेऱ्या राबवाव्या लागल्या. राज्यातील ९हजार ५५१ कनिष्ठ महाविद्यालयांत २१ लाख ७५ हजार ५९८ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यासाठी १४ लाख ९०हजार ५९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३लाख ४७ हजार ८११ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश मिळाला आहे. अद्यापही ८ लाख २७ हजार ७८७ जागा रिक्त असल्याने विशेष फेरीची गरज भासली.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ अंतर्गत ११ वीच्या कॅप आणि कोटा प्रवेश प्रक्रिया फेरीसाठी सुधारित वेळापत्रक १२ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी प्रसिद्ध केले.
हेही वाचा : IND U19 vs UAE U19 : ‘मी बिहारचा, मला फरक पडत नाही!’ स्फोटक शतकानंतर Vaibhav Suryavanshi चे खळबळजनक विधान
विशेष फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे रिक्त जागांची घोषणा १३ डिसेंबर २०२५ संबंधित सर्व महाविद्यालये त्यांच्या रिक्त जागांची माहिती प्रणालीवर प्रसिद्ध करतील. पात्र विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया १३ ते १४ डिसेंबर २०२५ महाविद्यालयांकडून पात्र विद्यार्थ्यांची निवड व यादी तयार करण्याची प्रक्रिया या दोन दिवसांत पूर्ण केली जाईल. निवड विद्यार्थ्यांची यादी जाहीर व प्रवेश प्रक्रिया १५ व १६ डिसेंबर २०२५ वेळ: स. ११.०० ते दुपारी ८ वा. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करून संबंधित महाविद्यालयांकडून प्रवेश दिला जाणार आहे. १७ डिसेंबर कॅप + कोटा दोन्हीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे अपलोड करून, फी भरून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत कॉलेजमध्ये प्रवेश पूर्ण करणे.






