वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मिडीया)
Vaibhav Suryavanshi’s statement after his explosive century : शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या अंडर १९ आशिया कपच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारत १९ वर्षांखालील संघाने आशिया कप स्पर्धेत युएई १९ वर्षांखालील संघासमोर ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांचा मोठा डोंगर उभा केला आणि भारताने युएईचा तब्बल २३४ धावांनी पराभूत केले. १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात ४३३ ही भारताची अंडर १९ एकदिवसीय सामन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे आणि अंडर-१९ आशिया कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शुक्रवारी खेळलेल्या अंडर १९ आशिया कपच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. त्याने ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि १४ षटकार ठोकले. त्याच्या शतकाच्या जोरावार प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने यजमान यूएईविरुद्ध ४३३ धावा काढल्या.
हेही वाचा : BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार
वैभव सूर्यवंशी सामन्यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली.सूर्यवंशी म्हणाला की, “मला सुरुवातीला वाटले की हा ५० षटकांचा सामना आहे, म्हणून मी १० ते १२ षटके काळजीपूर्वक खेळून काढण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मी माझ्या शैलीत खेळायला सुरुवात केली.” यावेळी जेव्हा वैभवला सामन्यादरम्यान यूएई संघाकडून करण्यात आलेल्या स्लेजिंगबद्दल विचारले असता वैभव म्हणाला की, “मी बिहारचा आहे, आणि माझ्या पाठीमागे कोणी काय बोलते याचा मला काही एक फरक पडत नाही.”
सामन्याआधी यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला बोलवले. यावेळी भारताकडून कर्णधार आयुष म्हात्रे ४ धावांवर बाद झाला. तर वैभव सूर्यवंशीने ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. आरोन जॉर्जने ७३ चेंडूत ६९ धावा आणि विहान मल्होत्राने ५५ चेंडूत ६९ धावा फटकावल्या. याशिवाय वेदांत त्रिवेदीने ३८, अभिज्ञान कुंडूने ३२ आणि कनिष्क चौहानने २८ धावा केल्या. भारताच्या फलंदाजाच्या शानदार कामागीरीच्या जोरावर भारताने ४ वाद ४३४ धावा केल्या.
यावेळी ४३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, यूएई संघ ५० षटकांत ७ गडी बाद केवळ १९९ धावा करू शकला. परिणामी यूएईला २३४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. यूएईकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उद्दीश सुरीने सर्वाधिक ७८ धावा केल्या. भारताकडून दीपेश देवेंद्रनने २ बळी घेतले, तर किशन सिंग, हेनिल पटेल, खिलन पटेल आणि विहान महलोत्रा यांनी प्रत्येकी १ बळी घेण्यात यश आले.






