स्कॉट एडवर्ड्सने टी-२० सामन्यात द्विशतक ठोकले (फोटो-सोशल मीडिया)
Scott Edwards’ T20 double century : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून प्रेक्षकांना मोठ्या धावसंख्येचा आणि स्फोटक फलंदाजीचा आनंद घेण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी सर्वांच्या नजरा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंडसारख्या मातब्बर संघांवर असणार आहेत. अशातच आता नेदरलँड्स संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने टी-२० सामन्यात द्विशतक झळकावून आपली क्षमता दाखवून दिली आहे.
हेही वाचा : BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार
ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी-२० स्पर्धेत खेळत असताना, स्कॉट एडवर्ड्सने चौकार आणि षटकारांची अतिषबाजी केली आहे. ज्यामुळे गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. क्लेन्झो ग्रुप शील्ड स्पर्धेत अल्टोना स्पोर्ट्स टी-२० फर्स्ट इलेव्हनकडून खेळत असताना स्कॉट एडवर्ड्सने चौथ्या फेरीच्या सामन्यात तुफानी द्विशतक ठोकले आहे. नेदरलँड्ससाठी ८२ टी-२० सामने खेळलेल्या एडवर्ड्सने स्थानिक गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला.
८१ चेंडूत २३ षटकार आणि १४ चौकार ठोकले आहे. विल्यम्स लँडिंग एससी टी-२० विरुद्धच्या या सामन्यात एडवर्ड्सच्या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि त्याने स्वतः डावाची दमदार सुरुवात केली. उजव्या हाताच्या फलंदाजाने विल्यम्सच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. त्याने फक्त ८१ चेंडूत २२९ धावांची वादळी खेळी केली. पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत तो नियंत्रणात दिसून आला. त्याच्या डावात एडवर्ड्सने चौकारांपेक्षा जास्त षटकारच ठोकले. त्याने यावेळी २८२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि या दरम्यान त्याने २३ षटकार आणि १४ चौकार मारले.
हेही वाचा : IND U19 vs UAE U19 : ‘मी बिहारचा, मला फरक पडत नाही!’ स्फोटक शतकानंतर Vaibhav Suryavanshi चे खळबळजनक विधान
एडवर्ड्सचे द्विशतक स्थानिक स्पर्धेत झळकवले असल्याने हे द्विशतक अधिकृत रेकॉर्डमध्ये गणण्यात येणार नाही. टी-२० विश्वचषकात त्याच्या किंवा त्याच्या संघाच्या कामगिरीवर याचा कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता देखील कमी होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा, २० षटकांच्या सामन्यात द्विशतक झळकावून त्याने निश्चितच मोठी कामगिरी केली आहे. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर त्याच्या अल्टोनाने संघाने ३०४ धावा केल्या. विल्यम्सचा संपूर्ण संघ १६.५ षटकांत फक्त ११० धावांवर गदगडला.






