महाराष्ट्र राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (ITI) समाजसुधारक तसेच सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय आज दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.राज्यात सध्या ४१९ शासकीय आणि ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. यामधील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्यात येणार आहेत.
या आयटीआय संस्थांचे नामकरण
या शासन निर्णयानुसार नामकरणामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, आनंद दिघे, बिरसा मुंडा आदींची नावे देण्यात आली आहे. त्यासंबंधी यादी खालीलप्रमाणे आहेत.
या 14 आयटीआयना नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार केला गेल्याचे दिसून येते.